संक्षिप्त

संक्षिप्त

पान ५ साठी, संक्षिप्त)

८४००८
कबनूरकर स्कूलमध्ये शिवजयंती
साखरपा ः कोंडगाव येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शिवजन्म, शिवपाळणा, स्वराज्य शपथ, राज्याभिषेक आदी दृश्ये साकारण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापिका लिना कबनूरकर आणि प्रमुख पाहुणे विनोद केतकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवचरित्रातील काही प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी लेझिम आणि पणतीनृत्यही सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे विनोद केतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केतकर यांनी अफझलखान वध आणि पन्हाळगड विजयाची कथा सांगितली. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका प्रमुख शर्वरी सुतार, तन्वी गांधी, स्वाती सकपाळ, श्वेता शेट्ये यांनी केले होते.

कोंडगावला शिवसेना ठाकरे शाखेचे उद्‍घाटन
साखरपा ः शिवसेना उद्धव गटाच्या कोंडगाव कार्यालयाचे उद्‌घाटन शिवजयंतीच्या मुहूर्तावर पार पडले. या वेळी आमदार राजन साळवी उपस्थित होते. कोंडगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो अभेद्य राखायचा आहे या हेतूने शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. कार्यालयासाठी आवश्यक जागा अजय सावंत यांनी विनामोबदला दिली आहे. आमदार साळवी यांनी सावंत यांचा सत्कार केला. या वेळी आमदार साळवी आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी सभापती जयसिंग माने, रजनी चिंगळे, दुर्गेश साळवी, कोंडगाव सरपंच प्रियंका जोयशी, साखरपा सरपंच रूचिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंत महाविद्यालयात आरोग्य तपासणी
साखरपा ः येथील आबासाहेब सावंत कला आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. साखरपा प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वतीने ही तपासणी करण्यात आली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. आर. पाटील यांनी ही तपासणी केली. आरोग्य सहाय्यक दत्तात्रय भस्मे, आरोग्यसेविका पांचाळ आणि आरोग्यसेवक जगन्नाथ पाटील आणि सतीश जाधव हे उपस्थित होते. महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात वजन, उंचीसह अन्य आजारपणांचीही तपासणी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रसाद झेपले यांनी सहकार्य केले.


८४०१५
शिवजयंतीनिमित्त पालखी मिरवणूक
राजापूर ः तालुक्यातील सोलगाव येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा सोलगाव नं. २ येथे मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलताशाच्या गजरामध्ये शिवछत्रपतींच्या पालखीची मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये राज दीक्षित तर मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी साऱ्यां‍चे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांनी शिवरायांचे कार्य आणि त्यांची शिकवण या संबंधित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मगदूम यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

८४०१६
खापणे महाविद्यालयात शिवजयंती
राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी डॉ. ए. डी. पाटील यांनी जाणता राजाचे स्वराज्याचे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता असून, आपण सार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्याचे प्रयत्न करूया, असे आवाहन केले. तत्पूर्वी, या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. पी. पी. राठोड यांनी केली. या वेळी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com