सावंतवाडीचा राजाराम वॉरियर्स संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीचा राजाराम वॉरियर्स संघ विजेता
सावंतवाडीचा राजाराम वॉरियर्स संघ विजेता

सावंतवाडीचा राजाराम वॉरियर्स संघ विजेता

sakal_logo
By

सावंतवाडीचा राजाराम वॉरियर्स संघ विजेता
खारेपाटण क्रिकेट स्पर्धाः गणराज इलेव्हन मिठबाव उपविजेता
खारेपाटण, ता. २० : खारेपाटण येथील क्रिकेट स्पर्धेत राजाराम वॉरियर्स संघ तळवडे-सावंतवाडी विजेता ठरला. तर गणराज इलेव्हन मिठबाव संघ उपविजेता ठरला. येथील झुंजार मित्रमंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
विजेत्‍या संघाला १ लाख ११ हजार १११ रूपये आणि चषक तर उपविजेत्‍या संघाला ५१ हजार १११ रूपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात आला. आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते दोन्ही संघांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत मिठबाव संघाचा खेळाडू नरेश गोविलकर याला उत्कृष्‍ट फलंदाज म्‍हणून गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज सागर कांबळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आरिफ (ब्लू लाईन मोसम), उत्कृष्‍ट यष्टिरक्षक म्हणून प्रथमेश पवार (मिठबाव), तर स्पर्धेचा मालिकावीर आणि सामनावीर चषक चा मानकरी राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघाचा ओंकार पाटील ठरला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी प्रसंगी.सदस्य रवींद्र जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत, रफिक नाईक, प्रवीण लोकरे, सुधीर कुबल, महेश कोळसुलकर, लियाकत काझी, मंगेश गुरव, मोहन कावळे, विरेंद्र चिके, प्रशांत गाठे, सूर्यकांत भालेकर, सुकांत वरूणकर, विजय देसाई, परवेज पटेल, शरद तोरसकर, शेजवली सरपंच मंदार राणे, कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदडे, ग्रा.पं. सदस्य गुरूप्रसाद शिंदे, जयदीप देसाई, किरण कर्ले, सावंतवाडी संघाचे मालक राजाराम गावडे, मिठबाव संघाचे मालक संजय मुद्रस, खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे प्रमुख उद्धव साबळे आदी उपस्थित होते.
या संपूर्ण स्पर्धेकरीता पंच म्हणून संजय पाटील, सुनील देशमुख, परवेज खान यांनी काम पाहिले तर समालोचक अमोल जमदाडे, विवेक परब, काका म्हात्रे, रोहन कदम, प्रसाद चाळके यांनी आणि गुणलेखन गणेश राऊळ यांनी केले.