देवरूख ः शिवप्रेमींच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः  शिवप्रेमींच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा
देवरूख ः शिवप्रेमींच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

देवरूख ः शिवप्रेमींच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

sakal_logo
By

-rat20p33.jpg ः KOP23L84124 देवरूख ः महिपत गडावर शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झालेले दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व समस्त शिवप्रेमी.
-------------
महिपतगडावर केला
शिवप्रेमींनी जन्मोत्सव
देवरूख, ता. २० ः संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी येथील महिपत गडावर दुर्गवीर प्रतिष्ठान व समस्त शिवप्रेमींच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. देवरूख ते किल्ले महिपतगड पायथा अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. गडावर पोहोचल्यानंतर परिसरात श्रमदान व स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. पानाफुलांनी गडाच्या प्रवेशद्वाराची सजावटदेखील करण्यात आली तसेच पालखी मिरवणूक, महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, गडदेवता महिषासूरमर्दिनीचे पूजन करण्यात आले. गडावर मशाल महोत्सव व दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शिवप्रेमीं सहभागी झाले होते.