रत्नागिरी ः मंगळवारपर्यंत रत्नागिरीत उन्हाचे चटके जाणवणार

रत्नागिरी ः मंगळवारपर्यंत रत्नागिरीत उन्हाचे चटके जाणवणार

रत्नागिरी ः उन्हाच्या चटक्यांमुळे आंबा फळाचे नुकसान होत आहे.


पान १ साठी)

फोटो ओळी
-rat२०p३२.jpg-


रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचे चटके
हवामान विभाग ; पारा ३९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
रत्नागिरी, ता. २० ः थंडीचा जोर ओसरल्यानंतर हळूहळू आता उन्हाळा तीव्रतेने जाणवू लागला आहे. हवामान खात्यानेही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २१) कोकण किनारपट्टी आणि कच्छमध्ये उष्णतेचा प्रभाव जाणवणार आहे. या काळात तापमान ३७ ते ३९ अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. उन्हाचा ताप पुढे कायम राहण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडूनही उपाययोजनांसंदर्भात रत्नागिरीकरांना आवाहन केले आहे.
हवामानशास्त्र विभागाने कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा जास्त प्रभाव असेल, असे सांगितले आहे. हवामान विभागाचा इशारा मंगळवारसाठी आहे. आज चटके लागत होते,उद्याही मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात पारा वाढेल, असा अंदाज आहे. हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदा उन्हाळा लवकर सुरू झाला आहे. सध्यातरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.वाढत्या उष्म्याला सामोरे जाण्यासाठीच्या सूचना दरवर्षी एप्रिल महिन्यात काढल्या जातात; परंतु यंदा दोन महिन्यापूर्वीच आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेविषयक आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. २०) केंद्रीय आरोग्य यंत्रणांकडून व्हीसीद्वारे राज्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील जिल्हापरिषद आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये उष्माघातामुळे होणारे आजार आणि उपाययोजना करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या हवामानामुळे गेल्या दोन दिवसात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. उष्मा वाढल्यामुळे विशेषतः लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडूनही सुरक्षेविषयक आवाहन करण्यात आले आहे.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका राज्यात खरीप हंगामातील पिकांना बसला होता. पूर, पाऊस आणि दुष्काळामुळं शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता रब्बी पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. सध्या तापमानात वाढ झाली आहे.


अशी घ्या काळजी
उन्हापासून वाचण्यासाठी पाण्याची बाटली जवळ ठेवावी. दुपारी ११ ते ४ या वेळेत काळजी घेतली पाहिजे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा. कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात. कॉटनचे कपडे शक्यतोवर हलक्या रंगांचेच असावेत, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन केले आहे.

कोट
दरवर्षी एप्रिल महिन्यात उन्हाच्या कडाक्याला सामोरे जाण्यासंदर्भात सूचना काढल्या जातात; मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यातच आवाहन केले आहे. या संर्दभात प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com