सन्मान, पुरस्काराने नारीशक्तीला बळ

सन्मान, पुरस्काराने नारीशक्तीला बळ

swt2034.jpg
84184
सावंतवाडीः मराठा समाज उत्कर्ष मंडळातर्फे जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार सन्मान विजेत्या अर्चना घारे-परब, भक्ती सावंत, सुजल राऊळ, गौरी परब, डॉ. अर्चना सावंत यांच्यासह संजू परब, संजना परब, उज्वला सावंत, मेघना राऊळ, ॲड. संतोष सावंत, विनोद सावंत आदी.

सन्मान, पुरस्काराने नारीशक्तीला बळ
अर्चना घारे-परब ः सावंतवाडीत महिलांचा ''मराठा उत्कर्ष''तर्फे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार देऊन महिलांचा सन्मान करण्याचा मराठा समाज उत्कर्ष मंडळाचा उपक्रम वाखाण्याजोगा आहे. महिलांनी आता कुटुंब वासल्यासह समाजसेवा, राजकारण आणि संघटनात्मक कार्यात अग्रेसर होणे गरजेचे आहे. नारीशक्तीला वेगळे स्थान देण्याचे कार्य अशा सन्मानाने मराठा समाज मंडळ करत आहे, असे मत अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिलाध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी-दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त जिजाऊ आदर्श महिला सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच महिलांची निवड मंडळातर्फे जिजाऊ आदर्श महिला पुरस्कारासाठी केली होती. त्यामध्ये अर्चना घारे-परब, सुजल राऊळ, भक्ती सावंत, गौरी परब, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष संजू परब, महिला अध्यक्ष संजना परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना घारे-परब म्हणाल्या, "या मंडळाने माझा शालेय जीवनात असताना सत्कार केला होता. आता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने गौरव केला आहे. महिलांनी समाजसेवेसाठी पुढे यायला हवे. मराठा समाज उत्कर्ष मंडळाने महिलांच्या सन्मानाची ही प्रथा कायम ठेवावी. पुढील वर्षी १०० महिलांचा सत्कार करून एक वेगळा उपक्रम राबवावा."
पुरस्कार विजेत्यांचा परिचय मंडळाचे सचिव ॲड संतोष सावंत यांनी तर, सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले. महाव्यवस्थापक सुनील राऊळ, पंढरी राऊळ, दत्ता सावंत, भूपेंद्र सावंत, विनोद सावंत, उज्वला सावंत, अभिमन्यू लोंढे, भरत गावडे आदी उपस्थित होते.

चौकट
मंडळाकडून दरवर्षी पाच मुले दत्तक
मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील पाच मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक जाईल आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार अशा कार्यातून आचरणात आणले जातील, अशी ग्वाही यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com