नोकरी टाळा, उद्योगांकडे वळा

नोकरी टाळा, उद्योगांकडे वळा

swt2037.jpg
84191
मालवणः टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नोकरी टाळा, उद्योगांकडे वळा
नारायण राणेः मालवणात विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शाळेतील शिक्षक करत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास विद्यार्थी कोणत्याही संकटांना तोंड देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी जिद्दी, महत्त्वाकांक्षी बनून नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केले. येथील टोपीवाला हायस्कूल येथे आज सायंकाळी आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मंत्री राणेंना विविध प्रश्न विचारले. राणेंनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव विजय कामत, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तप्रसाद खानोलकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गाशी संवाद साधत आहे. श्रेयस बर्वे या विद्यार्थ्याने, पाचवी व सातवी स्कॉलरशिपमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला एक हजार स्कॉलरशिप मिळत असून स्कॉलरशिपच्या रकमेत वाढ होण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्न उपस्थित केला. यावर राणे यांनी स्कॉलरशिपची रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कैवल्य मिसाळ याने स्पर्धा परीक्षांसाठी जिल्ह्यात कोणत्या सुविधा उपलब्ध करता येतील, असा प्रश्न विचारला. यावर राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र व सुसज्ज लायब्ररी उभारणार असल्याचे स्पष्ट केले. वेदांत नाईक याने मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी कोणते उपाय करता येतील, असा प्रश्न उपस्थित केला. यावर राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मराठी शाळा सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले. अमूल्या साटम हिने सिंधुदुर्गात इंटरनेटची सोय योग्य पद्धतीने नसल्याने अभ्यास करताना अडचणी असल्याचे सांगितले. यावर राणे यांनी फाईव्हजीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन नूरजहाँ नाईक यांनी, आभार देविदास वेरलकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com