भगव्या पताकांनी कुडाळ ''शिवमय''

भगव्या पताकांनी कुडाळ ''शिवमय''

swt216.jpg
L84281
कुडाळ : सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने शिवज्योत व छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.

भगव्या पताकांनी कुडाळ ‘शिवमय’
शिवजयंती उत्साहातः शहरासह ग्रामीण भागात शिवरायांचा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करीत रविवारी (ता. १९) येथे शिवजयंती सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा, शिवचरित्रावर आधारीत पोवाडे, नृत्य आणि शिवगीतांचे सादरीकरण, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, भगव्या पताका आणि शिवरायांचा जयघोष यामुळे अवघे कुडाळ शहर शिवमय झाले. विविध कार्यक्रमांतून शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी शासकीय कार्यालयांसह ग्रामीण भागात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
शिवजयंतीनिमित्त येथील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने अॅड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. मालवण किल्ला येथून शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर कॉलेज चौकात या शिवज्योतीचे स्वागत करून शहरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर राजमाता जिजाऊ आणि शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त मराठा समाजाचा वधू-वर सुचक मेळावा घेण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अॅड. सुहास सावंत, बंड्या सावंत, धीरज परब, शैलेश घोगळे, सचिन काळप, अभी गावडे, वैभव जाधव, सुंदर सावंत, संग्राम सावंत, रवी राऊळ, डॉ. प्रियांका पटाडे, अदिती सावंत, रेवती राणे, प्रमिला सावंत-भोसले, शैलेश काळप, गणेश पवार, सुबोध परब, हर्षद पालव, दिनेश घोगळे, ऋत्विज देसाई, सिद्धेश घोगळे, हरेश मोडक आदींसह मराठा समाज बांधव आणि शिवप्रेमी उपस्थित होते. सायंकाळी शिवचरित्रावर आधारीत पोवाडे, नृत्याविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शासकीय कार्यालयांसह डिगस, वेताळबांबर्डे, बिबवणे, निरुखे आदी तालुक्यातील विविध ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत शहरासह ग्रामीण भागात शिवजयंती सोहळ्याचा जल्लोष सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com