लांजा-तळवडे, येरवंडेमधील वणव्यात बागा भस्मसात

लांजा-तळवडे, येरवंडेमधील वणव्यात बागा भस्मसात

-rat21p16.jpg ः KOP23L84292 लांजा ः तळवडे, कणकवली, येरवंडे भागात लागलेला वणवा.
------------------

तळवडे, येरवंडेमधील वणव्यात बागा भस्मसात

लाखोंचे नुकसान ; पंचनाम्याची मागणी

लांजा, ता. २१ ः तालुक्यात तळवडे, येरवंडे आदी गावात सोमवारी (ता.२०) दुपारी लागलेल्या वणव्यामुळे आंबा आणि काजूच्या बागा भस्मसात झाल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारीही दुपारी तळवडे, कणकवली, येरवंडे भागात मोठा वणवा लागला. यामध्ये या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या आंबा व काजू बागायती होरपळून गेल्या आहेत. सध्या आंबा आणि काजूबागांना मोठ्या प्रमाणात फळधारणा होत आहे. अशा परिस्थितीत लागलेल्या वणव्यांमुळे आंबा आणि काजू भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वणव्यामध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर काय करावे, असा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी यांनी तातडीने याबाबतचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com