टुडे पान एक-आता कुरियरवरही करडी नजर

टुडे पान एक-आता कुरियरवरही करडी नजर

swt2113.jpg
84349
सिंधुदुर्गनगरीः अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठकीत बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने. सोबत अन्य अधिकारी.

आता कुरियरवरही करडी नजर
उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेशः अमली पदार्थ वाहतुकीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ः अमली पदार्थ खासगी कुरियरने तसेच पोस्टाद्वारे देवाण-घेवाण करण्याची शक्यता गृहित धरून अशा संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी करावी. यासाठी हॅन्डीस्कॅनरसह आवश्यक त्या ठिकाणी डॉग स्कॉडचाही वापर करावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी सर्वांचे स्वागत करून विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागांनी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी सोनोने म्हणाले, "जिल्ह्यामध्ये सध्या ई-पीक पाहणी ॲपवर पीक नोंदणीचे काम सुरू आहे. ई-पीक नोंदणी करताना गांजा लागवड झाली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी तत्काळ यंत्रणांना कळवावे. अमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी. नशाबंदी, व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने व्यसनामुळे होणाऱ्या आजारांबाबत कार्यक्रम घ्यावेत. व्याख्यान, कार्यशाळा त्याचबरोबर प्रशिक्षणाचे आयोजन करावे. सर्व विभागांनी संयुक्तपणे अमली पदार्थ लागवड, विक्री तसेच वाहतूक याविरोधात मोहीम राबवावी." बैठकीला उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, प्रभारी आरोग्य अधिकारी सई धुरी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस अलमेडा, उत्पादन शुल्क निरीक्षक अमित पाडळकर, वनपाल दत्तगुरू पिळणकर, तंत्र अधिकारी सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

कोट
आपल्या आसपासच्या परिसरात छुप्या पध्दतीने कोणी गांजा अथवा अफूची लागवड करत असल्यास किंवा केली असेल तर याबाबतची माहिती तत्काळ ओरोस येथील पोलिस नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल. शिवाय त्याला बक्षीसही दिले जाईल. अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीला अशा अवैध लागवडीची माहिती पुरवावी.
- संदीप भोसले, पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com