रत्नागिरी ः विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा

रत्नागिरी ः विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा

संग्रहित--KOP२१K७३३१९

रत्नागिरी विमानतळावर रात्रीही लँडिंग

पालकमंत्री उदय सामंत ; टर्मिनल इमारतीसाठी २१ कोटींचा निधी मिळाला
रत्नागिरी, ता. २१ ः रत्नागिरी विमानतळावर पुढील १५ दिवसात रात्रीही विमान उतरवण्याची सुविधा उभारली जाणार आहे. हा विमानतळ सुरू झाला की, आपसुकच उद्योजक येतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले,‘ येथील विमानतळावर ८० सीटर विमान उतरवण्यासाठी पूरक धावपट्टी उभारण्यात आली आहे. उद्योजकांना हे सोयीचे ठरणार असून, भविष्यात त्याचा फायदा होईल. रात्रीच्यावेळी हे विमान उतरण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहे. १०० मीटरची कंपाउंड भिंत उभारण्यासाठी निधी मंजूर झाला असून, टर्मिनल इमारतीसाठीही २१ कोटी रुपये मिळालेले आहेत. यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मागील अडीच वर्षे ही प्रक्रिया रखडलेली होती. विद्यमान जिल्हाधिकार्‍यांनी दोन महिन्यात ती पूर्ण केली तसेच जागेपोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रुपयांपैकी ४७ कोटी रुपये संबंधित जमीनमालकांच्या बँकखात्यात जमा झाले आहेत. १० लाखापासून एक कोटी रुपयांची रक्कम जागेपोटी तेथील लोकांना मंजूर झालेली आहे. भूसंपादनामुळे विमानतळाचा प्रश्‍न लवकरच सुटणार आहे.


चौकट
७५ हजार पदे भरणार
गेल्या काही दिवसात राज्य शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी पावले उचलली आहेत. विविध खात्यांमधील ७५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होईल, अशी माहिती सामंत यानी दिली.


चौकट
हार्टअॅटॅकचे प्रमाण दुप्पट
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मृत पावलेल्या गुहागर येथील त्या कर्मचार्‍याचा मृत्यू हार्टअॅटॅक आल्यामुळे झाला आहे. ते कामानिमित्त संबंधित कार्यालयात आले होते, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, देशामध्ये हार्टअॅटॅकमुळे मृत पावणार्‍यांचे प्रमाण ३ वर्षात दुप्पट झाले आहे. यामध्ये ३५ ते ४५ वयोगटातील लोकांचा टक्का अधिक आहे. यावर संशोधन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com