-निवृत्त अभियांत्रिकी सहाय्यकांचे 24 ला आंदोलन

-निवृत्त अभियांत्रिकी सहाय्यकांचे 24 ला आंदोलन

rat२२४२.TXT

बातमी क्र. ४२ (पान ३ साठी)

निवृत्त अभियांत्रिकी सहाय्यकांचे शुक्रवारी आंदोलन

रत्नागिरी, ता. २२ ः शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांनी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला असून शुक्रवारी (ता.२४) रत्नागिरीत प्रादेशिक परिमंडळासमोर मूक उपोषण करण्यात येणार आहे.
हे आंदोलन प्रामुख्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या नियुक्तीपासून वेतन निश्‍चिती करणे, कालबध्द पदोन्नती अंतर्गत वित्त विभागाच्या आदेशानुसार वेतन श्रेणीचा लाभ देणे व आश्‍वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निकालाप्रमाणे व राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने आदेश देऊनही संबंधित अधिकारी पुर्तता करीत नसल्याने निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. संघटनेच्या कृती समितीचे सचिव शिवाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. कर्मचा-यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ सर्व वयोवृध्द सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी, त्यांच्या संबंधीत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय आवारात सर्व महाराष्ट्रस्तरावर एकाच दिवशी २४ फेब्रुवारीला सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एक दिवशीय मूक अर्धनग्न आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियमानुसार सर्व १४ संवर्ग कर्मचा-यांचे पदनामांतर करून समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देणे, कालबध्द पदोन्नती अंतर्गत पहिला लाभ पदोन्नती साखळीतील वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ देणे, वेतन वाढीचा फरक रोखीने अदा करणे या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत, असे रत्नागिरी जिल्हा कृती समितीचे सदस्य लिलाधर रामचंद्र पटवर्धन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com