देवरूख ः आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात 25 ला आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

देवरूख ः आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात 25 ला आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

rat२३p७.jpg -KOP२३L८४७४१ फोटो- कार्यशाळेत सहभागी होणारे स्वीडनचे विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक.


स्वीडनचे विद्यार्थी देणार
आपत्कालीन उपचारांचे धडे

आठल्ये-सप्रे महाविद्यालय ; २५ ला आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
देवरूख, ता. २३ ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये शनिवारी (ता. २५) फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.भारत व स्वीडनमधील शिक्षणव्यवस्था, पर्यावरणविषयक अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयी चर्चा करण्यात येणार आहे. कार्यशाळेत स्वीडनमधील रॅडिंग कॉलेज, सॅंडोचे १८ विद्यार्थी, ४ शिक्षक व २ अभ्यासक सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये रॅडिंग कॉलेज सॅंडो, स्वीडनचे विद्यार्थी आपत्कालीन प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी पर्यावरणविषयक प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत.
ही कार्यशाळा स्व. अ. अ. पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉमर्स कॉलेजच्या ए. के. जोशी अॅक्टिव्हिटी हॉल येथे दुपारी २.३० ते ७ या वेळेत पार पडणार होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दिली आहे.महाविद्यालयाचे पर्यावरण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन स्वीडन येथील क्लायमेट ॲक्शन संस्था, सृष्टिज्ञान संस्था, मुंबई व सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरूख यांच्या सहकार्यातून कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेत परदेशी अभ्यासकांना महाराष्ट्रीयन लोककला, खाद्यसंस्कृती, पेहराव यांचीही ओळख या निमित्ताने करून देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्यावतीने या अगोदरही अमेरिका, स्वीडन येथील संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व परिषदा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या कार्यशाळेसाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com