लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे 50 फलक पालिकेने उतरवले

लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे 50 फलक पालिकेने उतरवले

rat२३४२.txt

बातमी क्र. ४२ ( पान ३ साठी)

rat२३p३६.jpg -

चिपळूण : विनापरवानगी झळकणारे फलक जप्त करताना नगर पालिकेचे कर्मचारी.

लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे ५० फलक उतरवले

चिपळुण पालिकेची कारवाई ; शहराचे सौदर्य बिघडवायला कारण

चिपळूण,ता.२३ : नगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरातील विविध भागात झळकणाऱ्या लोकप्रतिनिधी व काही व्यापाऱ्यांनी लावलेल्या फलकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ते फलक जप्त केले आहेत. गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या या मोहिमेत सुमारे ५० फलक खाली उतरविण्यात आले आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून विविध विषयांच्या फलकांनी चिपळूण शहराचे सौंदर्य कुरूप केले होते. शहर परिसरात सर्रास राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी, नेते, मंत्र्यांच्या वाढदिवसाचे फलक शहरातील बहादूरशेखनाका, पॉवरहाऊस, चिंचनाका, कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुल, गांधी चौक, भेंडीनाका, बाजारपूल, गोवळकोट कमानी परिसर आदी भागात दिसून येतात. मात्र यासाठी नगर पालिकेचा नाममात्र करही भरण्यास अनेकजण तयार नसतात. त्यामुळे फुकटची फलकबाजी शहरात अधिक दिसून येते. मात्र तरीही प्रशासन संबंधितांवर कोणतीही कारवाई न करता उलट त्यांनी लावलेले फलक काढून घेण्याचे काम करते. त्यामुळे फलकबाजी करणाऱ्यांचे फावले आहे. काही दिवसांपूर्वी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे येणार होते. त्यामुळे अनेकांनी त्यांचे स्वागत करणारे फलक शहरभर लावले होते. या शेकडो फलकांमधील बहुतांशी फलक विनापरवाना लावण्यात आले होते. या फलकांवर संबंधितांचे नाव, फोटोही होते. या फलकात कमी की काय म्हणून काही व्यापाऱ्यांनी आपल्या सेलच्या जाहिराती करणारे फलक लावून त्यात भर टाकली होती. त्यामुळे या मोठमोठ्या फलकांमुळे जुना बसस्थानक, चिंचनाका परिसर भरून गेला होता. याबाबत नाराजी व्यक्त करण्यास नागरिकांनी सुरूवात केली होती. त्यामुळे आता नगर पालिका प्रशासनाला जाग आली असून त्यांनी बुधवारपासून असे फलक जप्त करण्याची मोहीम सुरू केली. दोन दिवसांत पन्नासहून अधिक फलक जप्त करण्यात आले.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com