Tue, March 28, 2023

मालवणातून तरुण बेपत्ता
मालवणातून तरुण बेपत्ता
Published on : 23 February 2023, 2:57 am
swt2343.jpg
L84910
पारस बिष्ट
मालवणातून तरुण बेपत्ता
मालवण, ता. २३ : बांगीवाडा येथील पारस टेकबहाद्दूर बिष्ट (वय २१) हा कॉलेज युवक मंगळवारपासून (ता. २१) बेपत्ता आहे. याबाबत वडील टेकबहाद्दूर लोकबहाद्दूर बिष्ट यांनी तक्रार दिली आहे.
पारस बिष्ट हा कुडाळ कॉलेज येथे बीएस्सी आयटी विभागात शिकत आहे. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता कुडाळला कॉलेजात जातो असे सांगून तो घरातून निघाला; परंतु तो घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने तपकिरी रंगाचा शर्ट व सफेद रंगाची जीन्स परिधान केली असून त्याच्या बॅगमध्ये लॅपटॉप आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुशांत पवार हे करत आहेत.