एसआयएलसी स्थानिक

एसआयएलसी स्थानिक

गावरान अंडी कुक्कुटपालनाद्वारे
वाढवा आर्थिक उत्पन्न
येत्या शनिवारी कोल्हापुरात एकदिवसीय कार्यशाळा
कोल्हापूर, ता. २२ : दररोजच्या खाण्यात गावरान अंड्यांना असलेली वाढती मागणी बघता हा व्यवसाय करण्याला भरपूर वाव आहे. शिवाय छोट्या स्तरावर म्हणजे ५०० पक्ष्यांपासून व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. यातही करार पद्धतीने हा व्यवसाय केल्यास उत्पादीत केलेल्या अंड्यांची हमीभावाने खरेदी केली जाते. तसेच पक्षी मिळण्यापासून ते त्यांचे खाद्य व लसीकरण इ.साठीचे सहाय्य मिळू शकते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा येत्या शनिवारी (ता.२५) सकाळ ऍग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे कोल्हापुरात होत आहे.

यात लेअर अर्थात अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे कुक्कुटपालन, विकसित पक्ष्यांच्या विविध जाती, उपजाती, पक्ष्यांचे शेड, लिटर, पाणी व खाद्य व्यवस्थापन, औषध व लसीकरण व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थशास्त्र- भांडवली गुंतवणूक
व्यवसायाचा प्रकल्प आराखडा, चिकण व अंड्यांचे विक्री व्यवस्थापन,अंड्यांची हमीभावात खरेदी, पोल्ट्री यशस्वी करण्याची सूत्रे, व्यवसायासाठी शासकीय अनुदान इ.विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. जेवण, चहा, डिजीटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती १५०० रुपये शुल्क आहे.

----चौकट----
कार्यशाळा कधीः शनिवार,ता.२५ फेब्रुवारी २०२३
वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ५
ठिकाणः सकाळ कार्यालय, शिवाजी उदयमनगर, पार्वती चित्रमंदीराजवळ, कोल्हापूर
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१७५७२४३९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com