फोटोसंक्षिप्त-बांदा-सटमटवाडी येथे
रस्ता कामाचे भूमिपूजन

फोटोसंक्षिप्त-बांदा-सटमटवाडी येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

85011
बांदा ः सटमटवाडी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना सरपंच प्रियांका नाईक. शेजारी आबा धारगळकर, रुपाली शिरसाट आदी.

बांदा-सटमटवाडी येथील
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
बांदा ः सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते झाले. गेली कित्येक वर्षे या रस्त्याची मागणी होत होती. यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, सदस्या सौ. रुपाली शिरसाट, सागर सावंत, तातो परब, सचिन विर, देवा कळंगुटकर, मकरंद गोरे आदी उपस्थित होते. १७० मिटर लांबीच्या या रस्त्यासाठी नागरी सुविधा अंतर्गत ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
--
मांगूर उत्पादकांना दणका
खालापूर ः तालुक्यातील तलावावर बेकायदेशीर मांगुर उत्पादन करणाऱ्यांवर रायगड सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाकडून फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. या कारवाई अंतर्गत आत्तापर्यंत ३५ हजार किलो मासे नष्ट करण्यात आले आहेत.
पाताळगंगा नदी लगत असलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात मांगुर माशांची पैदास केली जाते. नदीकिनारी असलेल्या या तलावातील पाणी गटारातील पाण्यापेक्षा घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे. सडलेले खाद्य मांगुर माशांना खायला दिले जाते. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरत असून तलावातील पाणी नदी पात्रात सोडली जात असल्याने पाताळगंगा प्रदूषित होत आहे. तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची योजना देखील पातळगंगा नदीवर कार्यान्वित असल्यामुळे शेकडो कुटुंबांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे मांगुर हद्दपारसाठी कारवाईचा सपाटा लावला आहे.
---
शहापूर-धेरंडला उधाणाचा वेढा
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड ही गावे उधाणाच्या पाण्याने वेढली आहेत. तीन दिवसांपासून उधाणाचे पाणी गावात घुसल्याने २३ घरांचे नुकसान झाले आहे. पण कोणतीही प्रकारच्या उपाययोजना झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड या दोन गावातील जमीन एमआयडीसीने संपादित केलेली आहे. मात्र, खाडी किनाऱ्यावरील बांधबंधिस्तीची डागडुजी होत नसल्याने उधाणाचे पाणी सातत्याने गावामध्ये शिरत आहे. एमआयडीसी आणि खारलॅन्ड विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांचे नुकसान होत आहे.
या उधाणाची माहिती मिळताच पंडित पाटील यांनी तातडीने धेरंड, शहापूरचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी एमआयडीसी आणि खारलॅन्ड विभाग या समस्येवरून खो-खो खेळत आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच कायमस्वरुपी बंधाऱ्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर असताना पावसाळ्यापूर्वी बंधारा बांधणे गरजेचे असल्याची मागणी केली.
---
सुधागड किल्ल्याच्या शौर्यगाथेला उजाळा
पाली ः सुधागड किल्ल्याचे प्रतिष्ठेचे समजले जाणारे सरनाईक पद लाभलेले जाधव घराण्यातील सरनाईक मालजी जाधव यांची धोंडसे गावत गाडलेल्या अवस्थेतील समाधीचा अखेर शोध लागला आहे. मुंबईच्या दहिसरमध्ये राहणारे इतिहास संशोधक संदीप परब पाच वर्षांपासून समाधीच्या शोधण्याचे काम करत होते. या शोधामुळे सुधागड तालुक्यातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. सरनाईक मालजी जाधव यांची मौजे धोंडसे येथील ‘समाधी-एक अभ्यास’ या माध्यमातून इतिहासप्रेमी, अभ्यासक व संशोधक परब यांनी संशोधन सुरू केले होते. सरनाईक मालजी जाधव यांनी सुधागड किल्ला जिंकण्यासाठी पराक्रमाची पराकाष्ठा केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत तिवरे येथील सरदार संभाजी हैबतराव देशमुखही होते. तसेच गडावर असलेल्या भोराई देवीच्या मंदिराच्या व्यवस्थेविषयी संपूर्ण जबाबदारी मालजी जाधव यांच्यावर होती.
--
जमावबंदीच्या उल्लंघनप्रकरणी खोपोलीत कारवाई
खालापूर ः जमावबंदी आदेशांच्या उल्लंघनासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या सहा जणांविरोधात खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळफाटा-खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हा प्रकार घडला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा दिल्या गेल्या. तसेच या प्रकारामुळे रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन देखील झाले असल्याने खोपोली पोलिस ठाणे येथे गु.र.नं.६९/२०२३ भा.दं.वि.क. १४३, १८९, ५०४, ५०५,(२), महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१)चा भंग कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com