मॅरेथॉन स्पर्धेत सावर्डेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची बाजी

मॅरेथॉन स्पर्धेत सावर्डेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची बाजी

rat२४२७.txt

बातमी क्र. .२७ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
- ratchl२४२.jpg ः
८४९९८
चिपळूण ः मॅरेथॉन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य राजेंद्रकुमार वारे.
--
मॅरेथॉन स्पर्धेत सावर्डेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची बाजी

चिपळूण, ता. २४ ः रत्नागिरी येथे झालेल्या फिट रत्नागिरी, हॅप्पी रत्नागिरी या मॅरेथॉन स्पर्धेत सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे विद्यालयाच्या ७ आजी-माजी खेळाडूंनी बाजी मारत वर्चस्व गाजवले. यामध्ये योगिता तांबडकर (माजी), साक्षी जड्याळ (माजी), स्वराज जोशी, ऋतुराज घाणेकर (माजी), श्रेयस ओकटे, अनुजा पवार, हुमेरा सय्यद या खेळाडूंचा समावेश आहे. ही स्पर्धा २१ किमी, १० किमी, आणि ५ किमी अंतरात घेण्यात आली.
या स्पर्धेत २१ किलोमीटर स्पर्धेच्या महिला गटात प्रथम प्रमिला पाटील, द्वितीय शिल्पा केंबळे, तृतीय योगिता तांबडकर. २१ किमी पुरुष गटात प्रथम सिद्धश बर्जे, द्वितीय ओंकार बैकर, तृतीय समाधान पोकळे. १० किमीच्या महिला गटात प्रथम साक्षी जड्याळ, द्वितीय प्रिया करंबळे आणि तृतीय शमिका मंचेकर. १० किमी पुरुष गटात प्रथम स्वराज जोशी, द्वितीय अमेय धुळप, तृतीय ओमकार चांदवडे. ५ किमी महिला गटात प्रथम श्रुती दुर्गवळे, द्वितीय अमिता कुडकर, तृतीय सिद्धी इंगवले. ५ किमीच्या पुरुष गटात प्रथम प्रथमेश चिले, द्वितीय ऋतुराज घाणेकर, तृतीय नितेश मांईगडे. १८ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम रिया पाडळकर, द्वितीय साची कांबळे, तृतीय आर्ची नलावडे, चतुर्थ राखी थोरे. मुलांच्या गटात प्रथम अथर्व चव्हाण, द्वितीय श्रेयस ओकटे, तृतीय सुशांत आग्रे, चतुर्थ सौरभ घाणेकर. १४ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत प्रथम अनुजा पवार, द्वितीय हुमेरा सय्यद, तृतीय कार्तिकी भुरवणे. मुलांमध्ये प्रथम साईप्रसाद वराडकर, द्वितीय वीर मेटकर, तृतीय ओम भोरे याने. दिव्यांग गटामध्ये साधील नाकाडे याने बाजी मारली.
विद्यालयातील या यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक उदयराज कळंबे, सहाय्यक अमृत कडगावे, रोहित गमरे तसेच एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलातील कोच अविनाश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, प्राचार्य राजेंद्रकुमार वारे, उपप्राचार्य विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी अभिनंदन केले आहे. सावर्डे पंचक्रोशीतून सर्व यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com