अपघातातील जखमीचा
उपचारादरम्यान मृत्यू

अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

85099
शिवाजी सावंत

अपघातातील जखमीचा
उपचारादरम्यान मृत्यू
बांदा, ता. २४ ः इन्सुली-डोबाशेळ येथील शिवाजी तुकाराम सावंत (वय ७६) यांचा गोवा-बांबोळी येथे उपचारदरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली-डोबाचीशेळ येथे ८ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी पायी जाताना दुचाकीस्वाराने त्यांना मागून धडक दिली होती. या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. दुचाकीच्या धडकेत त्यांच्या दोन्ही पायांना व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविले होते. तेथे ते अतिदक्षता विभागात होते. उपचारांना त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा महेंद्र शिवाजी सावंत यांनी बांदा पोलिसांत दिली. बांदा पोलिस अधिक तपास करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक महेंद्र सावंत यांचे ते वडील तर इन्सुली ग्रामपंचायत सदस्य सौ. वर्षा सावंत यांचे ते सासरे होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com