भरधाव चिरेवाहू ट्रक कलंडला

भरधाव चिरेवाहू ट्रक कलंडला

85128
पिंगुळी ः अपघातग्रस्त चिरेवाहू ट्रक.

भरधाव चिरेवाहू ट्रक कलंडला

पिंगुळीत अपघात; अपघातामुळे तीन तास वीज खंडित

कुडाळ,ता.२४ ः पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर काल रात्री नऊच्या सुमारास भरधाव चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या अपघातामुळे पिंगुळी आणि नेरूर या गावात जवळपास ३ तास वीज गायब झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर गणेशघाट नजिक कर्नाटक पासिंग असलेला चिरे वाहतूक करणारा हा ट्रक भरधाव वेगात असताना पलटी झाला. यामुळे या मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात चिरे पडले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकचे चालक आणि क्लिनर हे दारूच्या नशेत होते. अतिशय भरधाव वेगात असलेला हा ट्रक अपघातग्रस्त झाला त्यावेळी सुदैवाने या मार्गावर वाहतूक नव्हती. ट्रक अपघातग्रस्त होताच चालक आणि क्लिनर हे पळून जाण्याच्या तयारीत होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी त्यांना ताब्यात घेवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या
अपघातस्थळी शेखर गावडे, प्रसाद गावडे, दीपक गावडे, जित मार्गी, बाबल गावडे, जगन्नाथ गावडे, मिलिंद धोंड, अभिषेक गावडे, गणेश गावडे, राजन पुरलकर, दाजी महाजन, रवि गावडे यांच्यासह २०० ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या चिरे किंवा वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचे प्रमाण वाढले असून यामुळे काही दिवसांपूर्वी काळसे येथे अपघातात महिलेला जीव गमवावा लागला होता. तर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे सुसाट डंपरने दुचाकीचे नुकसान केले होते. या भरधाव ट्रक किंवा डंपरवर कारवाई प्रशासनाकडून कडक कारवाई का होत नाही ? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थानी उपस्थित केला आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीस कायमचे अपंगत्व आले होते. पण मागील काही महिन्यांमध्ये बाहेरील राज्यातील पासींग असणाऱ्या भरधाव ट्रकच्या सिंधुदुर्गात सुळसुळाट सुरू आहे. यावर पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com