जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार खपवून घेणार नाही

जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार खपवून घेणार नाही

जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार खपवून घेणार नाही
केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा; कसब्यातील छत्रपती संभाजी स्मारकाला भेट
देवरूख, ता. २५ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन योजना ही महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेत काही ठिकाणी गडबड असल्याचे ऐकिवात येत आहे. या योजनेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेणार नाही, असा इशारा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिला.
येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित जलजीवन मिशन योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार पुजार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, जलजीवन योजना विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक संतोष गमरे, गटविकास अधिकारी भरत चौगुले, तहसीलदार सुहास थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, डॉ. अमित ठाकरे, महिला तालुकाध्यक्ष कोमल रहाटे ,मिथुन निकम आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, २०१४ नंतर भारतात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य नांदत आहे. गोरगरिबांपासून मध्यमवर्ग आणि उच्च वर्गात भेदभाव न करता सर्व प्रकारच्या योजना सर्वांसाठी राबवल्या जात आहेत. मग तो रस्ता असो, दळणवळण असो, इंटरनेट सुविधा असोत किंवा धान्यवाटप असो या योजना सर्व पूरक आहेत.
जलजीवन मिशन योजना ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. हर घर नलसे जल हे त्याच ब्रीदवाक्य आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत देशातील ८० टक्के घरात नळातून पाणी देणे हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही आणि सर्व अधिकारी झटत आहोत. कोकणात या योजनेत विरोधकांनी दबाव टाकून काही वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कानावर आली आहे. असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी आपल्या संगमेश्वर दौऱ्यात दुपारी कसबा येथील छत्रपती संभाजी पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर ते भाजप देवरूख कार्यालयात आले. त्यानंतर पंचायत समितीतील बैठक आटोपून नजीकच्या हातीव येथील आंबेडकर नगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेची पाहणी करून कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com