गुहागर-उद्या काम करतो उत्तराने खासदार तटकरे संतप्त

गुहागर-उद्या काम करतो उत्तराने खासदार तटकरे संतप्त

फोटो ओळी
-rat२६p३३.jpg-KOP२३L८५४६६ गुहागर : शासकीय विश्रामगृहात महामार्गाच्या कामाचा आढावा घेताना खासदार सुनील तटकरे

‘उद्या काम करतो’ उत्तराने खासदार तटकरे संतप्त
ठेकेदाराला नोटीस काढण्याचे फर्मान; गुहागर-विजापूर महामार्ग गाजला
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २६ : महामार्गा दरम्यान राहिलेली किरकोळ कामे ठेकेदाराकडून का करुन घेत नाही? अर्धवट कामांच्या पूर्ततेसाठी विलंब का? असे खडसावत खासदार सुनील तटकरे यांनी ठेकेदाराला नोटीस काढण्याची सूचना तहसीलदारांना केली. तसेच १० मार्चला होणाऱ्या दिशाच्या सभेत अहवाल द्या, असे फर्मानही महामार्गाच्या अधिकाऱ्यांना काढले.
खासदार सुनील तटकरे शनिवारी गुहागरच्या दौऱ्यावर होते. यावेळी घेतलेल्या बैठकीत गुहागर विजापूर महामार्गाच्या कामाबाबत झालेली चर्चा गाजली. शृंगारतळीतील महामार्गाच्या कामात तुटलेल्या जलवाहिन्या, पालपेटे फाट्यावरील पूल, गुहागरच्या शासकीय विश्रामगृहापासून शुन्य किमीपर्यंत राहिलेले काम, मार्गताम्हाने गावातील अर्धवट कामांची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. यापैकी जलवाहिन्यांचे काम अर्धवट का? असे विचारल्यावर ठेकेदाराने उद्यापासून सुरू करतो, असे सांगितले.
प्रवासी निवाऱ्यांचे कामाला कधी सुरवात करणार, असे विचारल्यावर पुन्हा ठेकेदाराने उद्यापासून असे सांगितले. गुहागरमधील काम भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे अर्धवट राहिले आहे. मात्र तेथील जलवाहिन्यांच्या कामाला का सुरवात केली नाही. या प्रश्नाचेही उत्तर उद्यापासून असे मिळाल्यावर संतापलेल्या खासदारांनी ठेकेदाराला नोटीस देण्याची सूचना तहसीलदारांना केली.
सभेतूनच थेट उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधून अर्धवट राहिलेल्या प्रक्रियेची माहिती घेतली. संपूर्ण कार्यवाहीला वेळ लागणार हे लक्षात येताच खासदारांनी गुहागरमध्ये ३ मार्चला तहसीलदार, नगराध्यक्ष व जागा मालकांची सभा घ्या. किती जागा जाणार, मोबदला किती देणार याची माहिती देवून जागा मालकांना विश्वासात घ्या व पुढील कामाला सुरवात करावी, अशी सूचना सभेतूनच प्रांताना केली. शृंगारतळी पुलाच्या कामासाठी आवश्यक वळण रस्त्याचा प्रश्न ग्रामपंचायत, तहसीलदार व महामार्गचे अधिकारी यांनी एकत्रपणे हा विषय सोडवावा. सर्वांनी ११ मार्च दरम्यान रत्नागिरीत होणाऱ्या दिशाच्या सभेमध्ये उपस्थित राहून आजच्या कामाचा अहवाल द्यावा, अशी सूचना खासदार तटकरे यांनी केली.


चौकट
अर्धवट कामांना आता सुरवात होईल
गुहागर-विजापूर महामार्गामधील प्रत्येक अर्धवट कामाची चर्चा खासदार तटकरेंनी घडवून आणली. मार्ग काढणे शक्य असलेले विषय लगेच मार्गी लावले. त्यामुळे अर्धवट कामांना आता सुरवात होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या सभेला गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com