कणकवलीत राष्ट्रसेविकांना मार्गदर्शन

कणकवलीत राष्ट्रसेविकांना मार्गदर्शन

कणकवलीत राष्ट्रसेविकांना मार्गदर्शन
कणकवली ः राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी कणकवली येथे सिंधुदुर्गातल्या सेविकांचे एकत्रीकरण करत मार्गदर्शन केले. कणकवली जानवली पुलाजवळ हॉटेल बावर्ची येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दीपप्रज्ज्वलन, प्रतिमापूजन, स्वागत आणि परिचय, वैयक्तिक पद्य, प्रात्यक्षिक, सांघिक पद्य, राष्ट्रसेविका समिती स्थापना व वाटचाल याविषयी चित्रफीतदर्शन व त्यानंतर शांताक्का यांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम झाले. शांताक्का यांनी उपस्थित सेविकांच्या शंकांचे निरसन केले. जिल्हा कार्यवाहिका मालती काळे, जिल्हा सहकार्यवाहिका सोनाली चन्ने, राष्ट्रसेविका समिती, गोवा येथील प्रांत संपर्कप्रमुख विजू उमर्ये आणि राजश्री जोग आदी उपस्थित होते.
.............
चेंदवणमध्ये दोन विद्यार्थिनी दत्तक
कुडाळ ः चेंदवण उपसरपंच रश्मी नाईक यांनी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवणमधील समीक्षा चेंदवणकर व प्रतीक्षा चेंदवणकर या दोन विद्यार्थिनींना बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शैक्षणिक दत्तक घेतले. या दोन्ही विद्यार्थिनींचा बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यार्थिनी आठवीमध्ये शिकत असून त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.
..............
‘एसटी’ वेळेत सोडण्याची मागणी
सावंतवाडी ः सध्या बारावी व दहावी परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने बस फेऱ्या वेळेत सोडण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहर परिसरातील महाविद्यालये, शाळांमध्ये येतात. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे एसटी हे परीक्षास्थळी पोहोचण्याचे साधन आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन बस फेऱ्या वेळेत सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com