रत्नागिरी-जिल्हा परिषदचे आणखी 18 विद्यार्थी जाणार इस्त्रोला

रत्नागिरी-जिल्हा परिषदचे आणखी 18 विद्यार्थी जाणार इस्त्रोला

जिल्हा परिषदचे आणखी १८ विद्यार्थी जाणार इस्त्रोला
समग्र शिक्षातून तिन लाख ; तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाला प्राधान्य
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढावी या उद्देशाने काढण्यात आलेल्या इस्त्रो भेटीचा पहिला दौरा यशस्वी झाला. आणखी १८ विद्यार्थ्यांना बेंगलोर येथे इस्त्रोत पाठविण्यत येणार आहे. शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानातून रत्नागिरी जिल्ह्याला तीन लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून हा दौरा काढला जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
नासा, इस्त्रो दौऱ्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव नियोजनला पाठविण्यात आला होता. पालकंमत्री उदय सामंत यांनी तो तत्काळ मंजूर केला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २७ मुलांची इस्त्रो सैर झाली. विद्यार्थ्यांची निवड परीक्षेतून करण्यात आली. त्यासाठी जिल्हाभरातील २३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. अंतराळ संशोधनाला भेट देऊन आल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. शासनाकडून समग्र शिक्षा अंतर्गत परराज्यातील दौर्‍यांसाठी निधी दिला जातो. या निधीतून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या तीन लाख रुपये १८ विद्यार्थ्यांना इस्त्रोला नेण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबर २ शिक्षकांचीही निवड केली गेली आहे. विद्यार्थ्यांची निवड करताना तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाला प्राधान्य देण्यात आले आहे. आदर्श शिक्षकांमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या दोन जणांना मुलांबरोबर पाठविण्यात येणार आहे. १३ मार्चला बेंगलोरला रवाना होणार आहेत.

कोट
नासा, इस्त्रो प्रकल्पाला कायमस्वरुपी निधी मिळत रहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुढील वर्षीही इस्त्रो दौर्‍यासाठी निधी मिळणार आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
- कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com