राजापूर-रानकुत्र्यांच्या झुंडीचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला

राजापूर-रानकुत्र्यांच्या झुंडीचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला

पान १ साठी

शेळ्यांच्या कळपावर
रानकुत्र्यांचा हल्ला
११ शेळ्या फस्त; जिल्ह्यात पहिलीच घटना
राजापूर, ता. २७ : तालुक्यातील वाटूळ-महादेववाडी येथे कोलसुंद्रे (रानकुत्री) या हिंस्र प्राण्यांच्या झुंडीने हल्ला करून ११ शेळ्या फस्त केल्या. रविवारी (ता. २६) सायंकाळी हा गंभीर प्रकार घडला. झुंडीने असलेल्या या कुत्र्यांनी अन्य शेळ्यांना जखमी केले आहे. रानकुत्र्यांनी हल्ल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाटूळ येथील ग्रामस्थ लहू गोविंद गोरे रविवारी नेहमीप्रमाणे दुपारी १२ वाजता गोठीतून ७० शेळ्या चरण्यासाठी सोडल्या. शेळ्या गावातील महादेव मंदिराच्या बाजूला भर वस्ती असलेल्या साल बांबर या ठिकाणी सायंकाळी ५ ते ५.३० वाजता या भागात होत्या. या दरम्यान कोलसुंद्रे नावाच्या कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या २० ते २५ हिंस्र प्राण्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी लहू गोरे यांची पत्नी सुवर्णा लहू गोरे याही त्यांच्याबरोबर शेळ्या चरवण्यासाठी गेल्या होत्या. हा प्रकार पाहून दोघेही भांबावून गेले. त्यांची आरडाओरड पाहून महादेव वाडीतील मुले, महिला व ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत हिंस्र प्राण्यांना पळवून लावले. पळवून लावत असताना त्यांच्या अंगावर येत होते. यामध्ये मनीष गुरव, सार्थक गुरव, कृष्णा गुरव, अरविंद गुरव, संजय चव्हाण, हेमंत चव्हाण, दशरथ वीर, बाळू चव्हाण व महिलांचा समावेश होता. या घटनेचा सविस्तर पंचनामा वनविभागाचे वनपाल एस. व्ही. घाडगे, सुरेश तेली यांनी केला.


कोट
कोणत्या हिंस्र प्राण्याने हल्ला केला आहे, त्याची खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याचा अंदाज बांधला जाईल.
- प्रकाश सुतार, रत्नागिरी विभागीय वन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com