‘बांद्यातील पूरग्रस्तांना 
तातडीने भरपाई द्या’ 
पूरग्रस्तांना तातडीने 
भरपाई द्या ः सावंत

‘बांद्यातील पूरग्रस्तांना तातडीने भरपाई द्या’ पूरग्रस्तांना तातडीने भरपाई द्या ः सावंत

85853
मिलिंद सावंत

‘बांद्यातील पूरग्रस्तांना
तातडीने भरपाई द्या’

मनसेतर्फे तहसीलदारांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः २०१९ मध्ये झालेल्या महापुरातील ७० हून अधिक नुकसानग्रस्तांना अद्यापपर्यंत शासनाची भरपाई मिळालेली नाही. याबाबत मनसे बांदा विभागामार्फत सावंतवाडी तहसीलदारांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात आले. बांदा विभागीय अध्यक्ष मिलिंद सावंत, तालुका उपाध्यक्ष सुनील आसवेकर यांनी उर्वरित नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.
२०१९ च्या महापुरातशहरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने भरपाई जाहीर केल्यानंतर १५१ पैकी ७० नुकसानग्रस्तांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. जाचक कागदपत्रांच्या अटींमुळे तीन वर्षे उलटूनही भरपाई मिळालेली नाही. याबाबत मनसेकडून सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यांच्याशी सावंत व आसवेकर यांनी सकारात्मक चर्चा केली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तातडीने भरपाई रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे उंडे यांनी स्पष्ट केले. नुकसानग्रस्तांकडे जनजागृती करून कागदपत्रे जमा करण्यात येतील, असे मनसेतर्फे सांगण्यात आले. कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच पुन्हा तहसीलदारांची भेट घेणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com