-चिपळूणला आज स्वच्छता अभियान

-चिपळूणला आज स्वच्छता अभियान

rat२८८.txt

बातमी क्र..८ (टुडे पान २ साठी)

चिपळूणला आज स्वच्छता अभियान

चिपळूण, ता. २८ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता. अलिबाग) यांच्यावतीने १ मार्चला सकाळी ७.३० ते १० या वेळेत चिपळूणमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हे कार्यक्रम घेण्यात आले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानचे हजारो श्री सदस्य या दिवशी संपूर्ण चिपळूणमध्ये स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
शहरांमध्ये विविध ठिकाणी स्वच्छतामोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. या वेळी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक आदींसह मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे.

या अभियानामध्ये चिपळूणप्रमाणेच लवेलअंतर्गत बोरज, शिव, आवाशी, लोटे, सोनगाव, अजगनी धामणंदअंतर्गत पंधरागाव, धामणंद, वावे, चोरवणे, साखर, पोसरे, पाली, मुसाड, काडवली, कासई, तळवट, कुरवळ, सावर्डेअंतर्गत आगवे, डेरवण, येगाव, कुठरे, असुर्डे, दुर्गवाडी, कोंडमळा, मांडकी, पालवण, खरवते, ओमळी, अलोरेअंतर्गत शिरगाव, पोफळी, अलोरे, पेढांबे, भराडे, तळसर, मुंढे, सतीअंतर्गत वालोटी, दसपटी, पिंपळी, कान्हे, पिंपळी, खेर्डी, खडपोली, मालघरअंतर्गत रामपूर, पाचाड, भोम, शिरळ, कोंढे व चिपळूणअंतर्गत पेढे, परशुराम, दळवटणे, कळंबस्ते, मोरवणे, आंबडस, भेलसई, कापसाळ, कामथे, टेरव इत्यादी गावातील हजारो श्री सदस्य चिपळूणमध्ये स्वच्छतेसाठी उपस्थित राहणार आहेत. या वेळी श्री सदस्य बहादूरशेख नाका ते चिंचनाका, चिंचनाका ते पॉवर हाऊस, विरेश्वर तलाव रस्ता-बसस्थानक-वीरेश्वर कॉलनी ते पॉवर हाऊस, अर्बन बँक ते भेंडीनाका, खेडेकर संकूल ते भेंडीनाका, पॉवर हाऊस ते पागनाका आदी भागातील रस्त्यांची साफसफाई करणार आहेत. या मोहिमेत गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी चिपळूण पालिकेने दोन डंपर, एक ट्रॅक्टरची व्यवस्था करून दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com