चिपळूण-आमदार शेखर निकम क्रिकेट स्पर्धेत 16 संघ सहभागी

चिपळूण-आमदार शेखर निकम क्रिकेट स्पर्धेत 16 संघ सहभागी

फोटो ओळी
-rat२८p४५.jpg ःKOP२३L८५९२० चिपळूण ः सावर्डे येथे आमदार शेखर निकम क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना माजी सभापती सौ. पूजा निकम. शेजारी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि मान्यवर.


आमदार शेखर निकम क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

चिपळूण, ता. २८ ः सावर्डे येथील यंग बॉईज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आमदार शेखर निकम चषक या नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (ता. २८) सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. राज्यातील १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम, सावर्डेचे सरपंच समिक्षा बागवे, यंग बॉईज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष केतन पवार, शेखर निकम युवामंच अध्यक्ष सचिन पाकळे, तिरूपतीचे संजय पाकळे, प्रशांत निकम, सह्याद्री शिक्षणसंस्था सचिव महेश महाडिक, कोंडमळा सरपंच रमेश म्हादे आदी उपस्थित होते. मराठी भाषा दिन असल्याने कार्यक्रमाची सुरवात मराठी प्रार्थना म्हणून गायिका समीक्षा वाडकर यांनी केली. कर्मा पिक्चरमधील दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झालेले पोलिसांच्या जीवनावरील गीत देवराज गरगटे आणि समीक्षा वाडकर यांनी गायले. सूत्रसंचालन तुषार बिजितकर यांनी केले. प्रस्तावना देवराज गरगटे यांनी मांडली. या वेळी मंडळाचे ज्येष्ठ व कनिष्ठ सर्व सभासद उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून राज पात्रे व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच लाभले. स्कोअरिंगसाठी विशाल सुर्वे, सुमित भंडारी आणि अभिमन्यू विचारे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचा अंतिम सामना आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com