मराठी संवर्धनासाठी वाचन आवश्यक

मराठी संवर्धनासाठी वाचन आवश्यक

85948
सुकळवाड ः येथील एमआयटीएम कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्राचार्य एस. सी. नवले यांच्या हस्ते झाले.

मराठी संवर्धनासाठी वाचन आवश्यक

प्रा. एस. सी. नवले ः सुकळवाडला मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

मालवण, ता. २८ : आजच्या युगात मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात अभियांत्रिकीचे शिक्षणही मातृभाषेतून मिळणार आहे. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही मराठी वाचनावर भर द्यावा. ग्रंथालयातील शिवसंग्रहालय तसेच मराठी साहित्य वाचावे, असे आवाहन प्राचार्य एस. सी. नवले यांनी सुकळवाड येथे केले.
जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) यांच्यातर्फे कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कॉलेजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि काव्य वाचन कार्यक्रम झाले. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कॉलेजच्या ग्रंथालय विभागाने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रारंभी प्रा. नवले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा. विशाल कुशे, प्रा. तुषार मालपेकर, संगणक विभागाचे प्रमुख मनोज खाडीलकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रंथालय विभागाच्या प्रमुख अपर्णा मांजरेकर यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाची थोडक्यात माहिती देत आगामी काळात मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करूया, असे आवाहन केले.
यावेळी मयुरी घाडी, समता पाटील या विद्यार्थिनींनी मराठी भाषेबाबत विचार मांडले. निबंध स्पर्धेत डिप्लोमा विभागात रामचंद्र सावंत, सुमित परब, तुषार घाडी, तर डिग्री विभागात महेश राठोड, समता पाटील, ओंकार पवार यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले. शिक्षकांसाठी घेतलेल्या निबंध स्पर्धेत मयुरी दिवाण यांनी प्रथम, तर प्रथमेश जठार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. तुषार मालपेकर, प्रा. तुषार तळकटकर यांनी केले. यावेळी प्रथमेश पालव, ऐश्वर्या पालव, साक्षी जिकमडे, रामचंद्र सावंत, सुमित परब, श्रेया पाटील यांनी कविता वाचन केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून प्रा. रोशनी वरक यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. प्रा. भाग्यश्री वाळके, ग्रंथालय कर्मचारी सायली पाटकर, मकरंद मेस्त्री यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्रथमेश पालव या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले. चित्रांगी मेस्त्री या विद्यार्थिनीने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com