नांदगावात सुसाट मोटार पलटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगावात सुसाट मोटार पलटी
नांदगावात सुसाट मोटार पलटी

नांदगावात सुसाट मोटार पलटी

sakal_logo
By

86014
नांदगाव ः ओटव फाटा येथील अपघातग्रस्त मोटार.

86015
नांदगाव ः विद्युत खांबाला अडकलेली मोटारीची चाके.


नांदगावात सुसाट मोटार पलटी

वीज खांबाला धडकल्याने चक्काचूर; प्रवासी किरकोळ जखमी

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २८ ः मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव ओटव माईन ब्रिजवरून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दैव बलवत्तर म्हणून आतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की ः मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक मोटार कणकवलीच्या दिशेने जात होती. ही मोटार येथील ओटव माईन ब्रिजवर आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि मोटार ओटव फाटा सेवा रस्त्यालगत दोन ते तीन वेळा पलटी होऊन जवळच असलेल्या विद्युत खांबावर आदळली. पहाटे पहाटे मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी तातडीने धाव घेतली. यावेळी मोटारीची पुढील दोन्ही चाके निखळून विद्युत खांबाला लटकत असल्याचे भयानक चित्र दिसले. स्थानिकानी तातडीने मदतकार्य करत मोटारीतील जखमींना बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून आतील प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. अपघाताची भीषणता पाहता आतील सगळेजण सुखरुप असल्याचे पाहून स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.