स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न घोषित करा

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न घोषित करा

rat०१९.txt

बातमी क्र. ९ (टुडे पान ४ साठी)

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न घोषित करा

साडवली ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त देवरूखवासियांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे एकत्रयेऊन अभिवादन केले. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरसेविका प्रतीक्षा वणकुद्रे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा शहाणे, अनिल साळवी, युयुत्सु आर्ते आदींसह व्यापारी, नागरिक उपस्थित होते. या वेळी आर्ते यांनी स्वातंत्र्यकाळातील सावरकरांचे कार्य विषद केले. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांची केलेली कामगिरी पाहता सावरकर यांना सरकारने भारतरत्न जाहीर करावे,असे मत व्यक्त केले. या मागणीसाठी लढा उभारला जाईल, सह्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहचवले जाईल प्रसंगी याच चौकात आंदोलनही करण्याची तयारी सर्वांनी बोलून दाखवली. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com