रत्नागिरी ः 19 हजार 199 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

रत्नागिरी ः 19 हजार 199 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

पान ३ साठी


जिल्ह्यात १९ हजार १९९ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
---
१६ भरारी पथकांचा ‘वॉच’; अर्धा तास अगोदर उपस्थिती बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः उद्या (ता. २)पासून सुरू होत असलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. दहावीच्या ७३ केंद्रांवर १९ हजार १९९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बोर्डाकडून १६ भरारी व बैठ्या पथकांद्वारे परीक्षेवर ‘वॉच’ राहील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकानिहाय भरारी पथके तयार केली आहेत. या परीक्षांच्या भयमुक्त व कॉपीमुक्त आयोजनाबाबत राज्य मंडळाने शिक्षासूची जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात भयमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करण्याचे निश्चित केले आहे. या वर्षांच्या परीक्षार्थींना निकोप वातावरणात परीक्षा देण्यास मदत होईल. कॉपीबहाद्दरांवर १६ भरारी पथकांची करडी नजर असेल. यावर्षी परीक्षा आयोजनात राज्य मंडळाने कडक शिक्षासूची जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तावरही भर देण्यात आला. परीक्षा केंद्रावर ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेसाठी केंद्रावर पोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांसह आगारप्रमुखांनी वेळेवर बस सोडाव्यात.

अखंडित वीजपुरवठा
परीक्षा केंद्रांवर पोचविणाऱ्‍या प्रश्नपत्रिका परीरक्षकांना जीपीएस प्रणाली लोकेशनद्वारे ट्रॅक केले जाणार आहे, तसेच परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवली जाणार आहेत. वीजपुरवठा परीक्षा कालावधीत खंडित होऊ नये, याबाबतचा पत्रव्यवहार शिक्षण विभागामार्फत करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com