वेंगुर्लेकर महाविद्यालयात विज्ञान दिन

वेंगुर्लेकर महाविद्यालयात विज्ञान दिन

86351
पणदूर ः येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मान्यवर उपस्थित होते.

वेंगुर्लेकर महाविद्यालयात विज्ञान दिन
कुडाळ ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे, त्यांना प्रेरित करणे, विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरी बद्दल जागरूक करणे हा या मागचा मुख्य उद्देश होता. महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सिद्धी कुठाळे यांनी सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या दिनानिमित्त ‘भाभा परमाणु अनुसंधान केंद्र’चे शास्त्रज्ञ संतोष टाकळे यांच्या विज्ञान विषयक व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. तन्वी सिंघन व प्रा. सिद्धी कुठाळे यांनीही ‘विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. सानिका चव्हाण, साक्षी डिचोलकर (एस.वाय.बीएस्सी आयटी) यांनी ‘रमन इफेक्ट’ या विषयावर माहितीपर भाषणे केली. वनिता गुरव (टी.वाय.बीएस्सी आयटी), सानिका मेस्त्री (एसवायबीएस्सी आयटी), रोहन परब (एफ.वाय.बीएस्सी आयटी) यांनी अविष्कार संशोधनसाठी तयार केलेल्या संशोधन प्रकल्पांची उपस्थितांना माहिती दिली. यावेळी संगणक शास्त्र माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा. तन्वी सिंघन, प्रा. तृप्ती कोकरे, प्रा. मृणाली कुडतरकर, प्रा. संचिता कोलापटे व विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com