चिपळूण ः  इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी पुन्हा हालचाली

चिपळूण ः इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी पुन्हा हालचाली

संग्रिहित--KOP२३L८६३९४

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी पुन्हा हालचाली

पावणेदोन कोटीची निविदा ; दुरुस्तीसाठी चार महिन्यांची मुदत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः नूतनीकरण होऊनदेखील तांत्रिक अडचणीमुळे रखडलेल्या शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू आहेत. केंद्रातील वातानुकूलित यंत्रणा तसेच अग्निशमन यंत्रणांच्या कामासाठी पावणेदोन कोटीची निविदा प्रसिद्ध केली आहे. ही कामे लवकर पूर्ण झाल्यास सांस्कृतिक केंद्र खुले होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते. सुमारे ७ कोटीहून अधिक निधी या कामावर खर्च झाला आहे; परंतु शेवटच्या घटकेला खुर्च्या खरेदीवरून मोठे राजकारण घडले. खुर्च्या खरेदीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप झाला. अवाढव्य झालेला खर्च, आगाऊ झालेली कामे आणि कामांचा दर्जा अशा अनेक अडचणींमुळे सांस्कृतिक केंद्र रखडून पडले आणि महापुरात पुन्हा बुडाले.
सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे म्हणून येथील नाट्यप्रेमी तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी प्रयत्न केले; परंतु तांत्रिक अडचणीचा गुंता सुटता सुटेना झाला. पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा या विषयाकडे लक्ष देत उर्वरित कामे तत्काळ करून घेण्याचा सूचना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिल्या होत्या. तसेच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी प्रशासकीय कार्यवाही सुरू केली होती. सांस्कृतिक केंद्रामध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यासाठी सुमारे १ कोटी १९ लाख तर अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी ४७ लाख इतका निधी विशेष अनुदान योजनेतून उपलब्ध करण्यात आला असून, त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कामाचा कालावधी ४ महिने देण्यात आला आहे. पुढील चार महिन्यात जर ही कामे पूर्ण झाली तर गणेशोत्सव किंवा दिवाळी सणाच्या मुहूर्तावर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र खुले होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com