''पशुसंवर्धन''चा 293 जणांना लाभ

''पशुसंवर्धन''चा 293 जणांना लाभ

‘पशुसंवर्धन’चा २९३ जणांना लाभ
विविध योजनाः ६ योजनांसाठी ५० लाख ४८ हजाराची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील २९३ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाने विविध योजना राबविण्यासाठी २०२२-२३ मध्ये १ कोटी २१ लाख ५ हजार ३०० रूपये निधीची सुधारित अंदाजपत्रकीय तरतूद केली आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या ६ योजनांसाठी ५० लाख ४८ हजार तरतूद आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकूण ६५९ प्रस्ताव प्राप्त असून त्यापैकी २९३ लाभार्थीना लाभ देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २०२२- २३ या आर्थिक वर्षात विविध योजनांसाठी जिल्हा परिषद स्व- उत्पन्नाचे १ कोटी २१ लाख ५ हजार ३०० रुपयाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनासह अन्य योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा, यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थीकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या ६ योजनांसाठी ६५९ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी निधीच्या तरतुदीनुसार २९३ लाभार्थींची निवड करण्यात आली आहे.
--------------
चौकट
योजनेनुसार निधीची तरतूद अन् लाभार्थी निवड

योजना*निधी तरतूद*लाभार्थी निवड
शेळी गट वाटप*१० लाख*३३
दुधाळ जनावरे पुरवठा*२५ लाख*६२
फैट टेस्टिंग मशीन*२ लाख ४३ हजार*६
कडबाकुट्टी मशीन पुरविणे*२ लाख ५५ हजार*२०
एक दिवशीय ५० कुक्कुट पिल्लांचा गट, पशुखाद्य पुरविणे*३ लाख ५० हजार*१५५
शेळी गट (५ शेळ्या १ बोकड )*७ लाख*२३
(शेवटच्या दोन योजना महिला सबलीकरण ७५ टक्के अनुदान)
--------------
कोट
जिल्हा परिषद पशु सवर्धन विभागाच्या विविध योजना साठी चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत; मात्र निधीची तरतूद मर्यादित असल्याने निधीच्या प्रमाणात लाभार्थीची निवड करून लाभ देण्यात आला आहे.
- डॉ. विद्यानंद देसाई, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
---------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com