सावर्डे-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

सावर्डे-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

rat०३१५.txt

बातमी क्र..१५ (टुडे १ साठी, संक्षिप्त)

डेरवण वालावलकर रुग्णालयात
वुमन्स वेल बिईंग शिबिर

सावर्डे ः चिपळूण तालुक्यातील डेरवण वालावलकर रुग्णालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमन्स वेल बिईंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ११ ते २५ मार्चला सकाळी ९ ते ४.३० या वेळेत डेरवण रुग्णालयात सोमवार वगळून पार पडणार आहे. फिनॉलेक्स इंडस्ट्री ज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन तसेच डेरवण वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक आठवडा महिलांच्या आरोग्यासाठी असा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे. विविध तपासण्या सोनोमॅमोग्राफी, सोनोग्राफी, फिजिशियन कन्सलटेंशन, गायनॅकोलॉजिकल कन्सल्टेशन, डाएट कन्सल्टेशन, पॅप स्मियर, रक्त तपासणी, सीबीसी, मधुमेह, युरिनबेस्ट क्लिनिकल, एक्झामिनेशन महिला तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली विविध तपासण्या या शिबिरात घेतल्या जाणार आहेत. या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन जागतिक दिनानिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी आठवडा वुमन्स वेल बिईंग साजरा करण्याचे आवाहन संयोजक यांनी केली आहे. या शिबिर मोहिमेत सहभागी होण्यासाठी डॉ. आसावरी मोडक, अभिषेक साळवी यांना संपर्क करावे असे अहवान रुग्णांना रुग्णालयाच्यावतीने केले आहे.
---

कबनूरकर स्कूलमध्ये कवितांचे वाचन

साखरपा ः शालेय पाठ्यपुस्तकात विद्यार्थी अनेक कविता शिकतात; पण त्या कवितांच्या कवींची भेट होत नाही. कवीची भेट व्हावी, त्यांच्या कविता त्यांच्याच समोर सादर व्हाव्यात या उद्देशाने कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कविता कवीच्या कवीसाठी या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साखरपा केंद्रशाळा नं. १ येथील शिक्षक उमेश डावरे हे स्वत: कवी आहेत. बालकविता हा अत्यंत आवडीचा विषय आहे. आजवर सुमारे ५० च्या वर त्यांनी बालकविता लिहिल्या आहेत. याच कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम कबनूरकर स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. डावरे यांच्या १७ कविता या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. सहावीतील विद्यार्थिनी निधी जोयशी, यशस्विनी सुर्वे यांच्याबरोबर आठवीतील निरजा पांचाळ, वैभवी लाड, कार्तिकी झोरे आणि कौस्तुभ बने यांनी या कविता सादर केल्या. याप्रसंगी शिक्षक अमित पंडित उपस्थित होते.
---

कसोपच्या देवीचा रविवारी पालखी सोहळा

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील कसोप मधील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देवी धनीन मातेचा पालखी सोहळा ५ मार्चला साजरा होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ७ वाजता भजनसंध्या हा पारंपरिक भजनाचा कार्यक्रम, रात्री १०.३० वाजता जिल्हास्तरीय आकर्षक ढोल वादन स्पर्धा होणार आहेत. रात्री १२ वाजता श्री देवी धनीन मातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव मंडळातर्फे करण्यात येत आहे.

---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com