विज्ञानामुळे मानवी जीवन सुखदायी

विज्ञानामुळे मानवी जीवन सुखदायी

86682
बांदा ः केंद्रशाळेत एस. व्ही. नाईक यांचा सत्कार करताना शिक्षक. सोबत इतर मान्यवर व विद्यार्थी.

विज्ञानामुळे मानवी जीवन सुखदायी

एस. व्ही. नाईक; बांदा केंद्रशाळेत लक्षवेधी विज्ञान प्रतिकृती

बांदा, ता. ३ ः विज्ञानाने लावलेल्या विविध शोधामुळे मानवी जीवन हे आनंदी व सुखदायी बनले असून विद्यार्थ्यांनी निसर्गातील प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, असे मत निवृत होणारे बांदा कॉलेजचे प्राध्यापक शरद नाईक यांनी बांदा केंद्र शाळा येथे शाळा पातळीवर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमच्या उद्‍घाटन प्रसंगी काढले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा येथे पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रतिकृती तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून प्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनात शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या लक्षवेधी प्रतिकृती मांडल्या होत्या. बांदा केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन प्रा. नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांचा शाळेतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी स्पंदन फाउंशनचे अध्यक्ष सिद्धेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com