होप फाउंडेशन शिष्यवृत्तीचे वितरण

होप फाउंडेशन शिष्यवृत्तीचे वितरण

rat०४९.txt

बातमी क्र.. ९ (पान ६ साठी)
(टीप- जाहिरातदार आहे.)

फोटो ओळी
-rat४p७.jpg-
८६८१४
रत्नागिरी ः फिनोलेक्स अॅकॅडमीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना होप फाउंडेशनच्या अध्यक्ष अरुणा कटारा. सोबत डॉ. भारत अगरवाल, डॉ. कौशल प्रसाद आदी.
---
फिनोलेक्स अॅकॅडमीत शिष्यवृत्तीचे वितरण

रत्नागिरी, ता. ४ ः फिनोलेक्स अॅकॅडमीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना चेअरमन प्राईज व स्व. श्रीमती मोहिनी छाब्रिया अॅवॉर्ड प्रत्येकी रुपये १० हजारची रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना होप फाउंडेशन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ओंकार खाडे, साक्षी कुडतरकर, आदिती श्रोत्री, श्वेता येणाजी, साहील पाकटे या विद्यार्थ्यांना होप फाऊंडेशन शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले.
उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६ लाख १९ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. ब्रेनवेव्हज २०२३च्या उद्घाटन कार्यक्रमात होप फाउंडेशन अध्यक्ष श्रीमती अरुणा कटारा व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगमध्ये सर्वप्रथम येण्यासाठी चेअरमन प्राईज श्वेता येणाजी हिने पटकावले. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात अॅकॅडमीमध्ये प्रत्येक शाखेतून प्रथम येण्यासाठी दिला जाणारा स्व. श्रीमती मोहिनी छाब्रिया अॅवॉर्ड इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून मंजूनाथ नरवडी, इलेक्ट्रिकल शाखेतून साक्षी कदम, मेकॅनिकल शाखेतून रूपाली पेडणेकर, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी शाखेतून राधिका आंबवकर, केमिकल शाखेतून ज्ञानेश्वरी केणी, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेतून मुस्कान गवंडी व मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन शाखेतून फातिमा मुल्ला, अमान गुप्ता तसेच मुंबई विद्यापीठात १०वा क्रमांक मिळवल्याबद्दल विवेक नेवगी याना प्रदान करण्यात आला. होप फाउंडेशन अध्यक्ष अरुणा कटारा यांच्यावतीने खेळातील विशेष प्रावीण्याबद्दल मुली व मुलांमधून सर्वोत्तम क्रीडापटू पारितोषिक दिले जाते. २०२२-२३ वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू आदिती शिवगण (तृतीय वर्ष मेकॅनिकल) व रोहित सावंत (तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल) यांना गौरवण्यात आले. सर्वोत्तम विद्यार्थांचे पारितोषिक तेजस लेले याने पटकावले
--
प्राध्यापकांचाही गौरव
डॉ. जयंत माने यांनी इलेक्ट्रिकल शाखेतून पीएचडी केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. डॉ. विनायक भराडी, प्रा. अतिया काझी, डॉ. शशिकांत गोईलकर, प्रा. सुहासिनी गोईलकर, डॉ मिलिंद किरकिरे, डॉ नितीन कणसे, प्रा. प्रशांत गिरी यांना पेटंट मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले. डॉ. केदार भिडे यांना एनपीटीइएल कोर्समधील प्रावीण्याबद्दल गौरवण्यात आले. प्रा. संतोष जाधव व प्रा. वैभव संसारे यांना पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल गौरवण्यात आले. नरेश पंड्ये यांनी पदवी संपादन केल्याबद्दल गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com