शिमगोत्सवातील वैशिष्ट्येची जनजागृती आवश्यक

शिमगोत्सवातील वैशिष्ट्येची जनजागृती आवश्यक

rat०४१३.txt

बातमी क्र..१३ (पान २ साठीमेन)

फोटो ओळी
-rat४p१५.jpg ः
८६८३६
चिपळूण ः पेठमाप येथील वाशिष्ठी नदीकिनारी श्री देवी करंजेश्वरीचे शेरणे काढण्याच्या कार्यक्रमाला अशी गर्दी होते.
--
शिमगोत्सव पर्यटन पॅकेज - भाग २---लोगो

शिमगोत्सवातील वैशिष्ट्ये सर्वदूर पोहचायला हवीत

टुरिस्ट गाईडची गरज ; श्रद्धेला हवी पर्यटनाची जोड

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः चिपळूण तालुक्यातील करंजेश्वरी आणि मंडणगड तालुक्यातील विविध गावांमध्ये शेरणे उत्सव प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तसेच देवीला नवस बोलण्यासाठी राज्यातून भक्त चिपळूणसह मंडणगड तालुक्यात येतात. त्यांची पावले पर्यटनस्थळांकडे वळली तर जिल्ह्यातील पर्यटन निश्चित वाढेल. त्यासाठी टुरिस्ट गाईड आणि जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सवाची माहिती पोहचवणाऱ्या यंत्रणेची गरज आहे. जनजागृतीद्वारे कोकणचे शिमगोत्सव आणि त्याचे वैशिष्ट्य सर्वदूर पोहचवणे शक्य आहे.
चिपळूण शहरातील पेठमाप भागात श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव म्हणजे जत्रा आणि शेरणे काढण्याचा कार्यक्रम होतो. भाविक मनात नवस बोलून शेरणे लपवतात. यात्रेच्या दिवशी देवीने शेरणे शोधले तर मनातील मनोकामना सफल होणार, असे मानले जाते. हा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो. राज्यातील भाविक या कार्यक्रमाला येतात; पण या गर्दीचे पर्यटकांमध्ये रूपांतर होत नाही. एक दिवसाची यात्रा झाली की माहेरवाशिणी आणि त्यांच्याबरोबर आलेले लोक निघून जातात.
मंडणगड तालुक्यातील शेवरे गावाची ग्रामदेवता वर्धानमातेची ढालकाठी हे तालुक्यातील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. ५० फूट उंचीच्या ढालकाठीवर आरूढ झालेली ८४ गावातून प्रवास करते. नवसेवाली बाय अशी या देवताची ख्याती आहे. पालखी या महोत्सवात बोरघर, माहू, कोंजर, कोन्हवली, आंबवणे खुर्द, वडवली, बोरघर, कुंभार्ली गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्या खेळतात. याचबरोबर कुंभार्लीतील खेळ्यांनी कोळीनृत्यांचा पारंपरिक कार्यक्रम सादर करतात. त्यामुळे शिमगोत्सवाची रंगत चांगलीच वाढते. भाविकही मोठ्या संख्येने पालख्यांची नृत्यकला पाहण्यासाठी गर्दी करून रात्रीच्यावेळी दिव्याचे रोषणाईत रंगलेल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. पहिल्या होमानंतर खेळी जाण्याची प्रथा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांतील पालख्यांच्या वर्षानुवर्षे सांभाळली आहे. पहिल्या होमापूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरात स्थानापन्न झालेल्या पालख्या या निमित्ताने सीमोल्लंघन करून गावोगाव फिरवल्या जातात. सर्वच ग्रामदेवतांच्या पालख्यांनी शहरात घरोघरी फिरून भाविकांना दर्शनाची संधी दिली जाते. कोन्हवली, टाकवली, आंबवणे बुद्रुक येथील पालख्यांसमवेत असलेले संकासूर पालखी महोत्सवाचे आर्कषण ठरते. गावोगावी शेरणे काढण्याचा कार्यक्रम होतो. हे कार्यक्रम पर्यटकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे म्हणजे मंडणगडमधील कासव संरक्षण चळवळ, गडकिल्ले, समुद्र याबरोबरच शिमगोत्सव पाहण्यासाठी लोक येतील.
--
जनजागृतीतून पर्यटन वाढ होईल
कोकणातील शिमगोत्सवाला भेट दिल्यानंतर येथील स्थानिक लोक आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला मिळते. याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे तरच चिपळूणच्या पर्यटनात भर पडेल. यात्रेनिमित्त येणारे भाविक दोन दिवस चिपळूणला राहतील. त्यातून पर्यटनावर आधारित व्यवसाय वाढतील.
...

-rat४p१३.jpg ः
८६८३४
विलास महाडिक

कोट
कोकणात शिमगोत्सवाच्या निमित्ताने नमन, खेळे, भारूड सादर करणाऱ्यांचे गट स्थापन होणे आवश्यक आहे. कोकणात पर्यटक आले आणि त्यांना ही लोककला पाहायची असेल तर कोणत्या लोकांशी संपर्क करावा, याची माहिती नाही. त्यामुळे लोकनृत्य सादर करणाऱ्यांचे संघटन होणे आवश्यक आहे.
- विलास महाडिक, चिपळूण पर्यटक अभ्यासक
--
-rat४p१४.jpg ः
८६८३५
अॅड. प्रसाद चिपळूणकर
कोट
करंजेश्वरी देवस्थान ट्रस्टने वेबसाईट तयार केली आहे. त्याच्यावर माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय देवीचे भक्त राज्यात आणि देशात पसरले आहेत. ते या जागृत देवस्थानची माहिती इतरांना देतात. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक चिपळूणला देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांना इतर धार्मिक आणि पर्यटनस्थळांची माहिती दिली जाते. भक्तनिवासामध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली जाते.

- अॅड प्रसाद चिपळूणकर -
अध्यक्ष, श्री देवी करंजेश्वर ट्रस्ट गोवळकोट
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com