अणसुरे-दांडे पुलाची दुरुस्ती सुरू

अणसुरे-दांडे पुलाची दुरुस्ती सुरू

rat४p२२.jpg
८६८९२
राजापूरः दांडेअणसुरे पुलाचे सुरू झालेले काम.
-------------
अणसुरे-दांडे पुलाची दुरुस्ती सुरू
खचल्याने वाहतूक धोकादायक; जुलैपर्यंत वाहतूक बंद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या तालुक्यातील अणसुरे दांडे येथील पुलाचा काही भाग खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, पुलावरून सुरू असलेली वाहतूक बंद केली आहे. जुलै २०२३ अखेरपर्यंत म्हणजे सुमारे चार ते पाच महिने हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
अणसुरे दांडे येथील पुलाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील भाग जोडला जात होता. या पुलामुळे सुमारे २० ते २५ किलोमीटरचे अंतरही कमी होत होते. त्यामुळे वाहनचालकांकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग वा सिंधुदुर्ग-रत्नागिरी असा प्रवास करण्यासाठी अधिक पसंती दिली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी या पुलाचा दांडेअणसुरे बाजूकडील काही भाग खचल्याने पुलावरून वाहतूक धोकादायक झालेली होती. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून, पूल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यावर बांधकाम विभागाचा भर राहणार आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या कामाच्या आरंभामुळे सद्यःस्थितीमध्ये पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुमारे चार ते पाच महिने वाहतूक ठप्प राहणार असून वाहनचालक अन् प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.

चौकट
आता कसे जाल?
अणसुरे-दांडे पुलावरून न जाता रत्नागिरीहून सिंधुदुर्गकडे जायचे झाल्यास जैतापूरच्या पुढे आल्यानंतर चिरेखाण फाट्यावरून सरळ डोंगरतिठामार्गे सागवेला जाता येईल आणि तिथून पुढे आंबेरी पुलावरून सिंधुदुर्गमध्ये जाता येईल. सिंधुदुर्गवरून येताना कात्रादेवीवाडी येथे आल्यावर डावीकडे दांडे बाजूला न वळता उजव्या बाजूकडे डोंगरतिठामार्गे राजापूर किंवा जैतापूरमार्गे रत्नागिरीला जाता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com