श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास प्रारंभ
श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास प्रारंभ

श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास प्रारंभ

sakal_logo
By

rat०४२६.txt

बातमी क्र. .२६ (पान ५ साठी)

फोटो ओळी
- ratchl४४.jpg ः
८६८९३
चिपळूण ः शिमगोत्सावासाठी करंजेश्वरी देवी आणि सोमेश्वराची पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या.
-----------

करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवात भाविकांचा जल्लोष

शिमगोत्सवास प्रारंभ ; उद्या प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम

चिपळूण, ता. ४ ः संपूर्ण कोकणात शेरणे कार्यक्रमामुळे प्रसिद्ध असलेल्या व गोवळकोट-पेठमापवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास शनिवारपासून (ता. ४) सुरवात झाली. ढोलताशाच्या गजरात मिरवणुकीने गोवळकोट मंदिरापासून वाजतगाजत पालखी निघाली. या निमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पालखीच्या स्वागतासाठी गोवळकोट परिसरातील रस्ते पताका, चमेली व रांगोळीने सजवण्यात आले होते.
शिमगोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने व शांततेत गुलालविरहित साजरा केला जातो. शेरणे कार्यक्रमामुळे या देवस्थानचा शिमगोत्सव संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. यावर्षी शिमगोत्सव निमित्ताने स्थानिक तरुण मंडळांनी रस्त्यावर विविध प्रकारची सजावट केल्याने गोवळकोट व पेठमाप परिसर सुशोभित झाला आहे. तसेच ठिकठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या आहेत. गोवळकोट येथील मंदिरापासून श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानच्या दोन्ही पालख्या शनिवारी दुपारी ३.३० वा. मंदिरातून बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर मंदिराभोवती ५ प्रदक्षिणा घालून या शिमगोत्सावाला सुरवात झाली. त्यानंतर देऊळवाडी, सहाणवाडी, हरवडेवाडी अशी आरत्या स्वीकारत दोन्ही पालख्यांनी मशिदीला भेट दिली. तेथे चौगुले कुंटुबीयांतर्फे मानाची पूजा करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही पालख्यांच्या साक्षीने सहाणवाडी येथे होम लावल्यानंतर गोविंदगडावर श्री देवी रेडजाई देवस्थानच्या भेटीसाठी नेण्यात आल्या. या ठिकाणी मानकरी जगताप कुटुंबीयांतर्फे पूजा झाल्यानंतर पालख्या पेठमापच्या दिशेने सायंकाळी उशिरा निघाल्या. या दोन्ही पालख्या रविवारी (ता. ५) पहाटे होम लावून पेठमाप येथील सहाणेवर विराजमान होणार आहेत. या ठिकाणी देवीची ओटी भरण्याचा व रात्री करमणुकीचा कार्यक्रम तर ६ मार्चला दुपारी ३ वाजल्यापासून या शिमगोत्सवातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी या दोन्ही पालख्या गोवळकोटच्या दिशेने येतील. ७ मार्चला पहाटे गोवळकोट सहाणवाडी येथे होम लावून तेथील सहाणेवर विराजमान होतील. येथेही देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी ४ वा. मिरवणुकीने पालख्या मंदिरात नेऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.