कणकवली रुग्णालयाला 
दोन वैद्यकीय अधिकारी

कणकवली रुग्णालयाला दोन वैद्यकीय अधिकारी

87083
कणकवली ः उपजिल्‍हा रूग्‍णालय.


कणकवली रुग्णालयाला
दोन वैद्यकीय अधिकारी

आजपासून रुग्णांच्या सेवेत दाखल

कणकवली, ता.५ : येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्‍ती करण्यात आली आहे. उद्या (ता.६) पासून हे डॉक्‍टर रूग्‍णालयात रूजू होणार आहेत, अशी माहिती आरोग्‍य विभागाने दिली.
कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात मंजूर २० पैकी केवळ तीन डॉक्‍टर आणि एक वैद्यकीय अधीक्षक कार्यरत आहेत. त्‍यामुळे येथील आरोग्‍यसेवा कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांना उपजिल्‍हा रूग्‍णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाहीच्या सूचना दिल्‍या होत्‍या. त्‍यानंतर आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी रुजू होणार असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये डॉ. ऐश्वर्या शेळके आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार यांचा समावेश आहे. हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी उद्या (ता.६) उपजिल्हा रुग्णालयात रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांच्या रिक्त असलेल्या पदांचा भार काही प्रमाणात हलका होण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com