rat0516.txt

rat0516.txt

rat५p८.jpg-ओळी rat५p८ ःKOP२३L८७०५१

तरुण भंडारी मित्र मंडळाचा मानाचा जय भंडारी चषकावर येथील जय भैरी मुरुगवाडाने आपले नाव कोरले.५१ हजार १११ व आकर्षक चषकासह खेळाडू.
-------
जय भंडारी चषकावर जय भैरी मुरुगवाडाची मोहर

तरुण भंडारी मित्र मंडळ ः डे-नाईट ओव्हरआर्म क्रिकेट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ः शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर तरुण भंडारी मित्र मंडळातर्फे डे-नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत मानाच्या जय भंडारी चषकावर जय भैरी मुरुगवाडा संघाने आपले नाव कोरले. अत्यंत रोमांचकारी झालेल्या सामन्यांमध्ये या मसंघाने मानाची ट्रॉफी आणि ५१ हजार १११ व आकर्षक चषक जिंकले. विजेत्यांना निरंजन सुर्वे, माजी आमदार बाळ माने, दिवाकर पिलणकर, यांच्याकडून बक्षीस देवून गौरवण्यात आले.
कोविड काळामध्ये बंद पडलेल्या भंडारी चषक स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा सुरुवात झाली. तालुक्यातील भंडारी समाजाच्या तरुणांनी भंडारी समाज एकसंघ रहावा यासाठी विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच भंडारी चषक आयोजित केला होता. यामध्ये जिल्ह्यातून तब्बल ५० पेक्षा जास्त संघ खेळण्यासाठी इच्छुक होते; पण प्रथम नोंदणी केलेले ३२ संघ सहभागी करण्यात आले होते. यामध्ये अंतिम सामना जय भैरी मुरुगवाडा व श्रीदा-११ घुठेवठार संघात झाला. अतिशय अटीतटीच्या रोमहर्षक सामन्यात जय भैरी मुरुगवाडा संघाने विजयी निर्धाव चेंडू टाकत विजेतेपद आपल्या कडे खेचत आणून ५१ हजार १११ व मानाचा जय भंडारी चषक तर द्वितीय क्रमांकाचे २५ हजार ५५५व मानाचा जय भंडारी चषक श्रीदा-११ घुठेवठार या संघाने पटकावला. यावेळी मिहीर माने, विराज माने, माधवी माने, बाळा उर्फ जिगर सुर्वे, मुन्ना मयेकर,रोहित मयेकर, राजीव कीर,अमेय विरकर, संतोष सातपेकर आदींचे सहकार्य लाभले. भविष्यात देखील तालुक्याच्या सांस्कृतिक व क्रीडा विश्वात असेच समाजोपयोगी उपक्रम चालू ठेवून भंडारी समाज एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे, त्याचप्रमाणे २०२३ दिपावली शुभेच्छा रॅली राजीव किर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा त्याच उत्साहात पार पडेल, असे भंडारी चषक मंडळाच्या आयोजकांकडून सांगण्यात आले. यावेळी भाग्येश मयेकर, मितेश बिर्जे, चिन्मय शेट्ये, परीस पाटील, साईश मयेकर, अजय मयेकर, ऋषिकेश शेट्ये, सिद्धेश् सुर्वे, आकाश मयेकर ,केतन पिलणकर, गौरव मयेकर, मेहुल गडदे,सोनम चव्हाण, दीपंकर भोळे, रोहित शिवलकर,राहूल शिवलकर,शुभम भिंगार्डे,चेतन बोरकर, अवधूत तांडेल, अनिकेत शिवलकर, अक्षय,सुर्वे, सुजल सुर्वे, हर्ष खेउर, अमोघ पिलणकर, श्रेयस कीर, सौरभ पिलणकर अभिषेक भोळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com