मंडणगड - अवैध वाहतुकीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष

मंडणगड - अवैध वाहतुकीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष

Rat५p७.jpg ःKOP२३L८७०५० मंडणगड ः रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसताना नागरिकांचे जीव धोक्यात घालून अवैध वाहतुकीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.

अवैध वाहतुकीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष

ओव्हरलोड बॉक्साईड ; प्रशासनाला अधिकारांचा विसर
मंडणगड, ता. ५ ः मंडणगड तालुक्यातील चार राज्यमार्ग व एका राष्ट्रीय महामार्गाचा वापर करून गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेल्या मल्टिएक्सेल वाहनांच्या विनापरवाना वाहतुकीप्रकरणी स्थानिक यंत्रणा प्रचंड दबावाखाली असल्याने कारवाई करण्याचे टाळत आहे. या संदर्भात वेळोवेळी तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची बोळवण चर्चा मीटिंग व पत्रप्रपंचाने केली जात आहे. तक्रारदारांना कुठलेही गैरकृत्य करून कायदा हातात न घेण्याचे आवाहन करणारी यंत्रणा स्वतःकडे असलेल्या अधिकारांचा वापरच करत नसल्याने वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
रस्त्यांशी संबंधित सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांनी सर्व तक्रारदारांसह संबंधित यंत्रणाना आपला स्वयंस्पष्ट अहवाल दिला आहे. या अहवालात त्यांनी अवजड मल्टिएक्सल वाहनांच्या वाहतुकीकरिता वापरात आलेले रस्ते हे २० ते ३० वर्षे जुने असल्याचे व त्याची वजनक्षमता ही त्याच काळात वाहनांच्या क्षमतेची असल्याचे स्पष्ट केले आहे व आशापुरा मायनिगंच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात कुठल्याही प्रकारचे मायनिंग होत नसल्याने सात ते आठ वर्षे आधी करण्यात आलेल्या उत्खननामुळे विद्यमान काळात शासनाच्या तिजोरीत एकही नवीन रुपयाचे स्वामित्व धन गोळा होणार नाही हे स्पष्ट आहे. असे असताना वाहतुकीमुळे नादुरस्त झालेल्या रस्त्याच्या डागडुजीसाठी नवीन निधी कुठल्या हेडखाली तातडीने उपलब्ध होणार आहे, असा प्रश्न जाणकारांनी निर्माण केला आहे.
वाहतुकीच्या माध्यमातून काही विशिष्ट वर्गाचे अर्थकारण तेजीत येणार आहे. त्यासाठी पूर्ण तालुक्यास कशाकरिता वेठीस धरले जात आहे? पावसाच्या तोंडावर वाहतूक बंद झाल्यावर पावसाळ्यात संपर्क तुटू नये याकरिता बांधकाम विभाग तातडीने रस्त्यांच्या डागडुजी करणार आहे का व याकरिता कोण निधी देणार आहे, असा प्रश्न तालुकावासीयांना पडला असून वाहतुकीमुळे नादुरुस्त होणाऱ्या रस्त्यांना दुरुस्तीसाठी दीर्घकाळाची प्रतीक्षा करावी लागणार हे सुद्धा स्पष्ट आहे.
असे असताना वाहतुकीशी संबंधित यंत्रणा आपली जबाबदारी मोठ्या आनंदाने दुसऱ्यावर टाकत आहे.


चौकट
२० वर्षापूर्वीची लोडिंग क्षमता
२० वर्षापूर्वीची लोडिंग क्षमता असलेल्या रस्त्यावर १५ ते २० टन इतके अधिक ओझे वाहतूक केले जात असताना जुजबी दंड आकारून वाहने सोडून देत आहेत. साठ ते सत्तर मल्टिएक्सल वाहने दररोज ये-जा करत आहेत. या मार्गावर पाचरळ, तुळशी पाले, कुंबळे लाटवण, कादवण इत्यादी गावातील नागरिकांच्या मुख्य रस्ता नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असताना यंत्रणा मात्र पत्रप्रपंचात व्यस्त आहे. पत्रकारसंघाने आंदोलनाचा गंभीर इशारा दिल्यानंतर झोपी गेलेली यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न तालुकावासीयांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com