साटेलीत कार पलटी

साटेलीत कार पलटी

८७१५०

चालकाचा ताबा सुटून
साटेलीत मोटार उलटली
एकजण बचावला ः डंपरने हूल दिल्याने अपघात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः सातार्डामार्गे मळेवाडच्या दिशेन येत असताना साटेली आरोस दरम्यानच्या अवघड वळणावर चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरने हूल दिल्याने ताबा सुटल्याने मोटार उलटली. यात मोटार (एम एच ०७ क्यू ६४१६) चे मोठे नुकसान झाले. कारचे मालक डॉ. सौरभ पाटील (२९ रा. रेडी-म्हारतळेवाडी) हे सुदैवाने बालंबाल बचावले.
साटेली-आरोस रस्त्यावरून बेकायदेशीरपणे चिरे वाहतूक होत असून या अवघड वळणावर चिरे वाहतूक करणाऱ्यांनी एखादा गार्ड नेमणे गरजेचे आहे. तसे नसल्याने अचानक याठिकाणी समोरुन वाहने येत असल्याने अपघात होत आहेत. भविष्यात एखाद्या अपघातात बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल यावेळी डॉ. पाटील यांनी केला. या सर्व बेकायदेशीर प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com