दिवाणी न्यायाधीश परीक्षेत
अॅड. काकतकर यांना यश

दिवाणी न्यायाधीश परीक्षेत अॅड. काकतकर यांना यश

87309
अॅड. केयुर काकतकर

दिवाणी न्यायाधीश परीक्षेत
अॅड. काकतकर यांना यश

कणकवली,ता. ७ ः कलमठ गावचे सुपुत्र अॅड. केयुर दिनेश काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. सतत ७ वर्षे अथक परिश्रमानंतर अखेर अॅड. काकतकर यांनी आपले ध्येय साध्य करत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे.
अॅड. काकतकर यांनी एमपीएससी २०२१ च्या परीक्षेत हे यश प्राप्त केले आहे. त्यांनी २ जुलै २०२१ रोजी मुख्य परीक्षेत मेरिट मध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी तोंडी मुलाखत १० जानेवारी रोजी दिली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी रोजी लागला असून संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ६२ जणांच्या यादीत अॅड.केयुर यांची २६ व्या क्रमांकाने निवड झाली आहे. याबद्दल अॅड.केयुर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे मुटाट येथील शाखा व्यवस्थापक दिनेश काकतकर आणि जिल्हा परिषद शाळा माईन नं १ च्या मुख्याध्यापिका दीपा काकतकर यांचा चिरंजीव असलेल्या अॅड. केयुर यांचे प्राथमिक शिक्षण करूळ येथील प्राथमिक शाळेत झाले. एस. एम. हायस्कुल मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर अॅड.केयुर यांनी पदवी शिक्षण पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये २०१३ साली पूर्ण केले.त्यानंतर व्हिक्टर डांन्टस लॉ कॉलेज कुडाळमधून २०१६ साली एलएलबी ची पदवी घेतली. त्यानंतर ५ वर्षे कुडाळमधील प्रतिथयश वकील अजित भणगे यांच्याकडे ज्युनिअरशीप केली. सध्या अॅड. केयुर हे स्वतंत्रपणे वकीली व्यवसाय करत आहेत. अॅड. केयुर यांना पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षेत अपयश आले होते. तरीही न खचता त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. या संपूर्ण परीक्षा कालावधीत केयुर यांना अॅड. अजित भणगे, अॅड. संदेश तायशेट्ये, अॅड. बापू गव्हाणकर, अॅड. मंगेश जाधव, अॅड. यतीश खानोलकर, औरंगाबाद येथील रवींद्र लोसरवार, व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे प्रा.विवेक जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सोलापूर येथील आळंगेलॉ क्लासेस यांचे मार्गदर्शन लाभले. या यशात अॅड. केयुर यांना आईवडील, पत्नी कोमल, बहीण केतकी यांची मोलाची साथ लाभल्याचे अॅड.केयुर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com