वेंगुर्लेत रंगपंचमी उत्साहात साजरी

वेंगुर्लेत रंगपंचमी उत्साहात साजरी

८७५६९
वेंगुर्लेत रंगपंचमी उत्साहात साजरी
वेंगुर्ले ः तालुक्यात कालपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. आज विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली. कोकणात इतर सणांबरोबरच होळी सणाला फार महत्त्व आहे. काल सायंकाळी ७ नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात आंब्याच्या, पोफळीच्या होळी नाचवत ज्या ठिकाणी घातली जाते, त्या ठिकाणी आणण्यात आली. तेथे पूजन करून गाऱ्हाणे करण्यात आले. शहरात काल रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, पूर्वस मंदिर, होळकर मंदिर, दत्तमंदिर, सुंदर भाटले या ठिकाणी होळी घालण्यात आली. तर आज सकाळी कुबलवाडा तसेच सायंकाळी देऊळवाडा, परबवाडा या ठिकाणी होळी घालण्यात आली. यात अबालवृद्धांनी सहभाग घेऊन होळी उत्सवाचा आनंद लुटला.

87349
माड्याचीवाडी ः जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांनी धुळीवंदनाचा आनंद लुटला.

जिव्हाळा सेवाश्रमात धुलिवंदन
कुडाळ ः तालुक्यातील माड्याचीवाडी-रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांनी धुळीवंदनाचा आनंद लुटला. सुरेश बिर्जे संचलित जिव्हाळा सेवाश्रमात लहान मुलांसह वृद्ध वास्तव करत आहेत. या सर्व वृद्धांचा आनंद द्विगणित करण्यासाठी गेली सहा वर्षे जिव्हाळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. आपल्या भारतीय सणांची आठवण या निमित्ताने करून दिली जाते. होळी सणाच्या निमित्ताने सेवाश्रमात लहान मुलांसह वृद्धांनी रंगांची उधळण करत होळीचा आनंद द्विगुणीत केला. जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक संचालक सुरेश बिर्जे, श्रेया बिर्जे, संजय बिर्जे, राजू बिर्जे, साक्षी बिर्जे, गीतांजली बिर्जे यांच्यासह बिर्जे कुटुंबीयांनी धुलिवंदनात वृद्धांसमवेत आनंदाचे क्षण साजरे केले.
.................
आंबेरी पूल बांधकामात ऐतिहासिकता जपावी
कुडाळ ः खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगाव-आंबेरी नदीवर नवीन पूल मंजूर करून पूर्णत्वास येत आहे. हे काम करताना जुने आंबेरी पूल न तोडता त्यावर बंधारा तयार करून पाणी अडवावे. जेणेकरून पाण्याची पातळी वाढेल, अशी मागणी शिवसेनेने बांधकामकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर तालुक्यातील ब्रिटिशकालीन पुलाचा नमुना म्हणून याचे जतन व्हावे. श्रीमंत बापूसाहेब भोसले यांनी खास माणगाव खोऱ्यासाठी हे पूल बांधून घेतले होते. त्यामुळे हे पूल न पडता त्यावर बंधारा बांधून त्यांच्या आठवणी अबाधित ठेवाव्यात, अशी विनंती करण्यात आली. याबाबतचे निवेदन बांधकामच्या अभियंता अनामिका जाधव यांना देण्यात आले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना उपविभागप्रमुख एकनाथ धुरी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com