कोंडुरा-सातार्डा डांबरीकरणाचे काम निकृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडुरा-सातार्डा डांबरीकरणाचे काम निकृष्ट
कोंडुरा-सातार्डा डांबरीकरणाचे काम निकृष्ट

कोंडुरा-सातार्डा डांबरीकरणाचे काम निकृष्ट

sakal_logo
By

कोंडुरा-सातार्डा डांबरीकरणाचे काम निकृष्ट

मराठेंची खंत; बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ : कोंडुरा-साटेली-सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार मळेवाड-कोंडुरा उपसरपंच हेमंत मराठे यांनी ‘बांधकाम’च्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे.
बांधकाम विभागाकडून कोंडुरा-साटेली-सातार्डा मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित काम करत असताना अत्याधुनिक यंत्रसामग्री असतानाही रस्त्याचा पृष्ठभाग हा एका पातळीमध्ये येत नसल्याचे दिसून येते. डांबरीकरण काम सुरू असताना ‘बांधकाम’चा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ‘अधिकारी एसीत, ठेकेदार खुशीत आणि काम दूषित’ अशी स्थिती या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची झाल्याचे उपसरपंच मराठे यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गावर यापूर्वी ठेकेदाराने काम करताना केलेल्या चुकांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला. त्याची पुनरावृत्ती झाल्यास भविष्यात वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. याबाबत ठोस उपाययोजना करून रस्ताकाम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मराठे यांनी केली आहे. दर्जाहीन काम झाल्यास उपोषण छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.