क्राईम एकत्रित

क्राईम एकत्रित

rat०८२१.txt

बातमी क्र.२१ ( पान ३ साठी)

देवधेत बंगला फोडून चोरी

लांजा ः घरामध्ये कोणीच नसल्याचा फायदा उठवत मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार देवधे खालची सावंतवाडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी सांगितले, की देवधे खालची सावंतवाडी येथे सोनाली नारायण करंबेळे यांचा बंगला आहे. १ व २ मार्चला त्या आपल्या मुलाकडे मुंबई येथे गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने काढून घरामध्ये प्रवेश केला. घरातील ४६ हजार ५०० रु. रोकड, १७ हजाराचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे प्लेन रिंग, १ हजार रु. ३ ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे, ५ हजार रु. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा हिक व्हिजन डिव्हीआर सेट, २ हजार ५०० रु. फायबर राऊटर व जीओ कंपनीचे सीम असे एकूण ७२ हजार रुपये किंमतीचे साहित्य अज्ञाताने चोरून नेले. करंबेळे या ४ मार्चला गावी आल्यानंतर त्यांना आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आमंगळवारी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
-----------------------------
आंबये येथील खैराच्या झाडाची चोरी

खेड : तालुक्यातील आंबये सकपाळवाडी येथील एका शेतकऱ्याच्या मालकीची २ लाख रुपये किमतीची खैराची झाडे चोरट्यांनी चोरली. याप्रकरणी येथील वन विभाग आणि खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आंबये येथील शेतकरी संतोष शांताराम सकपाळ यांचे जमिनीतील सुमारे पंधरा ते वीस पूर्ण वाढ झालेली झाडे अज्ञातांनी ता. २ मार्च रोजी भर दिवसा तोडून वाहनातून चोरून नेली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार खैराच्या झाडांची किंमत सुमारे दोन लाख आहे. आंबये येथील शेतकऱ्याने खैराची झाडे तोडतानाचे फोटो, तसेच ज्या वाहनातून त्याची वाहतूक केली जात होती, त्या वाहनांचे फोटोहीतक्रारी सोबत जोडले आहेत. खैर तोडीच्या वाढत्या प्रकारामुळे निसर्गाचा -हास होत आहे. यावर वेळीच कारवाई करून अनधिकृत खैराची कत्तल होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
---
खेडमध्ये दारू अड्डयांवर छापे

खेड : शहरासह तालुक्यातील नांदिवली-केळणेवाडी व दंडवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून ३ हजार ८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी विठ्ठल कदम, लक्ष्मण आखाडे, प्रकाश इनरकर या संशयितांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिस शिपाई अजय कडू व प्रवीण खांबे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com