रेल्वे

रेल्वे

rat०९११.txt

बातमी क्र. ११ (टुडे १ साठी, संक्षीप्त)

एलटीटी-करमळी वातानुकूलित
विशेष गाडी आजपासून
रत्नागिरी : शिमगोत्सवाकरिता कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी वातानुकूलित विशेष गाडी आज (ता.९) पासून धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून आज रात्री सव्वादहा वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ती करमळी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १० मार्च रोजी करमळी येथून सायंकाळी ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वा. एलटीटीला पोहोचेल. ही २२ डब्यांची विशेष गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकात थांबेल.

----

रोहा ते चिपळूण मेमू रविवार पर्यंत रद्द

रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रोहा ते चिपळूण मार्गावर सुरु करणाऱ्‍यात आलेल्या मेमू स्पेशल पॅसेंजर ट्रेनच्या फेऱ्‍या ९ ते १२ मार्च २०२३ या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रोहा – चिपळूण ही मेमू स्पेशल गाडी ९ ते १२ मार्चसाठी तर चिपळूण- रोहा ही परतीची मेमू देखील वरील कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या साईसाठी मेमू ट्रेनच्या जादा फेऱ्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com