समुद्र जाणून घेण्यासाठी!

समुद्र जाणून घेण्यासाठी!

rat०२१२.txt

बातमी क्र..१२

(२४ फेब्रुवारी टुडे चार फोटोही घ्यावा)

सागरमंथन ..................लोगो

rat२५p.jpg -

डॉ. स्वप्नजा मोहिते

समुद्र जाणून घेण्यासाठी!

महासागर ही आपल्या पृथ्वीवरील सर्वात मोठी परिसंस्था आहे जी हवामानाचे नियमन करते आणि अब्जावधी लोकांना उपजीविका देते. आपण सगळेच अपरिहार्यपणे समुद्रावर अवलंबून आहोत. डॉ. सिल्विया अर्ल या अमेरिकन मारिन बायोलॉजिस्ट आणि ओशनोग्राफर यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही कुठे राहता हे महत्वाचे नाही. तरीही तुम्ही पीत असलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाने, तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक श्वासाने तुम्ही समुद्राशी जोडलेले आहात. जगण्यासाठी लागणाऱ्या प्राणवायूपासून अब्जावधी लोकांना स्वस्त आणि सहज पचणारी प्रथिने मिळवून देणारा, वेगवेगळ्या उद्योगांसाठी लागणारी साधनसंपत्ती आणि रोजगाराची साधने उपलब्ध करून देणारा आणि आपणच उत्सर्जित करत असलेल्या कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण नियंत्रित करणारा सागर हा सगळ्याच सजीवांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे; पण याच सगळ्यात मोठ्या परिसंस्थेचे आरोग्य धोक्यात असल्याची घंटा वाजली ती युनायटेड नेशन्सच्या २०१७ सालातील पहिल्या ओशन कॉन्फरन्समध्ये! ही पहिली परिषद, महासागराच्या समस्यांबद्दल जगाला सतर्क करण्यासाठी गेम चेंजर म्हणून पाहिली गेली.
महासागरांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी नावीन्यपूर्ण, विज्ञान आधारित उपायांचा अवलंब करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला, एक व्यासपीठ या परिषदेद्वारे प्रदान करण्यात आले आहे. समुद्रांचे आम्लीकरण, प्रदूषण, बेकायदेशीर मासेमारी आणि अधिवास आणि जैवविविधतेचे नुकसान यासारख्या प्रश्नांवर या परिषदेत विचार केला जातो आणि त्यानुसार विविध कार्यक्रमाची रचना करण्यावर इथे भर दिला जातो. दुसरी परिषद जून २०२२ मध्ये लिस्बन येथे भरवण्यात आली होती. यामध्ये सदस्य राष्ट्रे, गैर सरकारी संस्था आणि विद्यापीठे यांच्या प्रतिनिधींसह तसेच ''ब्लू इकॉनॉमी'' शाश्वतपणे विकसित करण्याचे मार्ग शोधणारे उद्योजक यांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत युनायटेड नेशन्सची महत्वाकांक्षी ''शाश्वत विकासासाठी महासागर विज्ञानाचे दशक (२०२१ - २०३०)'' ही एक प्रमुख थीम होती आणि आरोग्यदायी, अधिक शाश्वत महासागराबद्दल विचारांचे मंथन या परिषदेत झाले. ब्लू इकॉनॉमीची व्याख्या ''सागरी आणि किनारी परिसंस्थांचे आरोग्य जतन करताना आर्थिक वाढीसाठी, सुधारित उपजीविका आणि नोकऱ्यांसाठी सागरी संसाधनांचा शाश्वत वापर'' अशी केली गेली आहे. म्हणजेच समुद्रातील संसाधने वापरताना त्यांचे जतन, संरक्षण करत, समुद्राचे आरोग्य कसे सुरक्षित राहील यावर सगळ्याच राष्ट्रांनी भर द्यायचा आहे. हवामान बदल कमी करण्यात महासागर अविभाज्य भूमिका निभावतात आणि मानवामुळे निर्माण होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनाच्या सुमारे २३ टक्के आणि मानवामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंमुळे निर्माण होणाऱ्‍या ९० टक्केपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतात. हे तर आता सगळ्यांनीच मान्य केले आहे. असे असतानाही १९२ पैकी फक्त ८ देशांनी पॅरिस अग्रीमेंटनुसार ठरवलेल्या नॅशनल डिटरमाईंड कॉन्ट्रिब्युशन (NDC) मध्ये सागरी कार्बन सिक्वेस्ट्रेशनबद्दल योजना दिल्या आहेत. त्यातही सध्यातरी दोनच देशांनी समुद्रातून मिळू शकणाऱ्या अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. हे लक्षात घेऊनच शाश्वत महासागर अर्थव्यवस्थेसाठी निर्माण करण्यात आलेल्या उच्चस्तरीय पॅनेल (एचएलपी)ने सागरी अवकाशीय नियोजन, ऊर्जा, उद्योग, सरकार, संवर्धन आणि करमणुकीसह अनेक क्षेत्रांचा विचार केला आहे. या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या उद्योजक आणि संस्थांना एकत्र आणणारी प्रक्रिया, माहितीपूर्ण आणि समन्वयित करण्यासाठी एक समान दृष्टिकोन आवश्यक आहे. यामुळे सागरी संसाधनांचा शाश्वत वापर कसा करायचा याचे निर्णय जागतिक स्तरावर घेता येतील.
एकात्मिक महासागर नियोजन दृष्टिकोन देशांना कार्यक्षमपणे आणि प्रभावीपणे हवामान बदलाला तोंड देण्यास योजना तयार करण्यात आणि पाण्याच्या खाली जीवन हे जागतिक स्तरावर ठरवण्यात आलेले शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी, शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचे संरक्षण आणि शाश्वत वापर करण्यासाठी मदत करतो. यामध्ये पर्यटन, ऑफशोअर पवन ऊर्जा आणि व्यावसायिक मासेमारीसारख्या सागरी आर्थिक क्षेत्रांमध्ये सामील असलेल्या विविध वापरकर्त्यांच्या संबंधित भूमिका आणि योगदान ठरवणे समाविष्ट केले आहे. यातूनच हवामान बदल जाणून घेत योग्य अनुकूलन आणि हवामान बदलांचे परिणाम कमी करण्याच्या उपायांना समर्थन देऊन, एकात्मिक महासागर नियोजनातून SDG १३ हे हवामान बदलासंबंधित ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते. एकूणच या योजना संवेदनक्षम अशा इकोसिस्टम्स आणि किनाऱ्यावरील जनसमुदायांची असुरक्षादेखील कमी करतात तसेच देशांना हवामान बदलांना कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे तोंड देण्यास सक्षम करतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे मोझांबिकची नुकतीच मंजूर झालेली सागरी अवकाशीय योजना. ही योजना विशेषत: किनारपट्टीवरील धूप, किनाऱ्यांच्या संरक्षण कार्यांसाठी सर्वोत्तम स्थान निवडण्यासाठी, हवामान बदलाचे परिणाम अभ्यासण्यासाठी वैज्ञानिक मूल्यांकन करून निसर्ग आधारित उपाय लागू करण्यासाठी मदत करते.
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला समुद्रांकडेच वळावे लागणार आहे. समुद्राच्या मदतीने ऑफशोअर नूतनीकरणक्षम ऊर्जा मिळवणे, कार्बन उत्सर्जित करणाऱ्या इंधनाचा कमीत कमी वापर, डीकार्बोनाइज्ड सागरी वाहतूक आणि बंदर पायाभूत सुविधा, किनारी आणि सागरी परिसंस्थेद्वारे कार्बनचे शोषण (याला ब्लू कार्बन असेही म्हणतात) आणि सागरी क्षेत्रांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन मर्यादित करणे अशा उपायांच्याद्वारे आपण जगाला भेडसावत असणाऱ्या या समस्यांवर उपाययोजना करू शकतो. निसर्गाधारित उपाय तसेच तंत्रज्ञानाचा एकत्रित उपयोग करत जैवविविधतेचे आणि परिसंस्थांचे संरक्षण करता येऊ शकते. सागरी गवताळ प्रदेश आणि खारफुटी जवळपास ५० टक्के उत्सर्जित कार्बन, आपल्या चिखलमय गाळात साठवून ठेवू शकतात. प्रवाळांची बेटे लाटांच्या तडाख्यांपासून संरक्षण देऊ शकतात. कार्बन साठवून ठेवू शकतील, अशा सागरी संरक्षित क्षेत्रांचा विकास त्या त्या प्रदेशातील कार्बन सिक्वेस्ट्रेशन करू शकणाऱ्या मूळ प्रजातींचे संरक्षण किंवा पुनर्संचयित करणे, माशांचा आढळ आणि स्थलांतर यावर हवामान बदलाचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि त्यांना या बदलांसाठी अनुकूलन करण्यासाठी मदत करणे अशा अनेक योजना, समुद्र आणि त्यातील परिसंस्था यांचा विचार करून आखता येऊ शकतात. म्हणूनच जागतिक बँकेने हवामान बदल कृती योजना (२०२१-२०२५) आखत त्यात महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. याद्वारे ३५ टक्के वित्तपुरवठ्यामध्ये हवामानसह लाभ असणे आवश्यक आहे आणि ५० टक्के वित्तपुरवठ्यात हवामान बदलासाठी अनुकूलन करणाऱ्या योजना असणे आवश्यक आहेत. त्यामुळे बँक समर्थित ब्लू इकॉनॉमी प्रकल्पांमध्ये हवामान बदलाचा समावेश केल्याने विकसनशील देशांना हवामान बदलाच्या प्रभावांना कमी करण्यास (उदा. ऑफशोअर क्लीन एनर्जीद्वारे) आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास (उदा. निसर्ग-आधारित उपायांद्वारे) मदत होईल. या सगळ्यासाठीच समुद्र आधारित प्लॅनिंग महत्वाचे ठरणार आहे. या उपायांमुळे सागरी आणि किनारी व्यवस्थापन सुधारेल आणि देशांना शाश्वत आणि लवचिक विकास करण्यास मदत होईल.

(लेखिका मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे मत्स्यजीव शास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com